A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::open($save_path, $name) should either be compatible with SessionHandlerInterface::open(string $path, string $name): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 132

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::close() should either be compatible with SessionHandlerInterface::close(): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 292

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::read($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::read(string $id): string|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 166

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::write($session_id, $session_data) should either be compatible with SessionHandlerInterface::write(string $id, string $data): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 235

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::destroy($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::destroy(string $id): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 315

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::gc($maxlifetime) should either be compatible with SessionHandlerInterface::gc(int $max_lifetime): int|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 356

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

बा रायगड परिवार,महाराष्ट्र

ब्लॉगगड कसा पहावा

गड कसा पहावा …. याचं विश्लेषणच मुळात गड का पहावा या प्रश्नापासून सुरु होत.

गड म्हणजे काय हो , डोंगरकड्यांना तासून, तटबंदी बांधून संरक्षित केलेली जागा का ..?? नक्कीच नाही, हे गडकिल्ले म्हणजे राज्यचं सार अन राजाचा जीव. या गडकिल्ल्यांच्या जीवावरच हे स्वराज्य टिकले अन वाढले. खरतर किल्ले हे शिवपूर्व काळापासून अस्तित्वात आहेत, परंतु माझ्या राजानं त्यात जान फुंकली अन त्यांना रयतेच्या संरक्षणार्थ सिद्ध केले. आज छत्रपतींना अनुभवायचं असेल तर ह्या गडकिल्ल्यांशिवाय पर्याय आहे का ???  इतिहास कितीही वाचला तरीही तो भूगोलाशिवाय समजत नाही, अन भूगोलाचा अर्थ इतिहासाशिवाय लागत नाही.

असो…

माझा सह्याद्री खरंतर एक शाळा आहे अन गडकील्ले त्याचे शिक्षक…, त्या शाळेत गेल्यावर उच्चविभुशीत झाल्यासारखं वाटतं. परंतु या शाळेत जाताना प्राथमिक अभ्यास करून गेलातरचं चांगले नाहीतर हि शाळा वर्गाबाहेरच उभा करते (आला काय अन नाय आला काय सारखच)…

आजकाल शनिवारी प्लान ठरतो अन शनिवारी रात्री किंवा रविवारी पहाटे बाहेर पडतो दुर्ग भ्रमंती करायला. त्यात अजून एक फ्याड आलंय ट्रेक इवेंट (अर्थात मीही अनुभव घेतलाय याचा ) , भटकण्याची आवड असणारे एकत्र येतात अन  ८-९ तासात ट्रेक उरकतात , परंतु समजून काही घेत नाही कारण तशी दृष्टीचं नसते ( तसं काहीच न करण्यापेक्षा हेही चांगलच)…

पण हा सह्याद्री अन हे दुर्ग फक्त सहलीसाठी नाहीत , यांनी इतिहास घडवलाय तो समजून घेतला पाहिजे, त्यासाठी तशी नजर निर्माण झाली पाहिजे… तशी नजर निर्माण झाल्याशिवाय हा ऐतिहासिक वारसा टिकणार कसा … पूर्वजांची पुण्याई, कर्तुत्व वारसांना कळणार कसं ….

सतीशदादा म्हणतात तसे , हे गोरे आपला इतिहास अनुभवायला जाडजूड पुस्तकं घेऊन येतात अन आम्ही साधी उजळणी सुद्धा बाळगत नाही…

पण नक्की काय करायचं ???

त्याची उत्तरं मेजरसाहेबांच्या प्रश्नांत शोधण्याचा प्रयत्न करू…

सगळ्यात हक्काचा अन प्राथमिक मित्र गुगलबाबा .. गुगल आपल्याला इतिहास शोधायला लय मदत करतो. एखाद्या ठिकाणी जायचं तर त्याचा इतिहास माहित करूनचं एवढं जरी ध्यानी घेतलं तरी एक दुर्ग चिकित्सक वृत्ती अपोआप तयार होते. ऐतिहासिक साधनांमधून, थोरामोठ्यांच्या इतिहाससंशोधानातून, चिकित्सक भटक्यांच्या लेखातून गडाचा अन रहाळ परिसराचा धांडोळा घ्याचया अन मगच भ्रमंतीसाठी बाहेर पडायचं. बाहेर पडताना जे वाचलंय त्याच्या संक्षिप्त नोट्स काढून न्याव्या. संशोधक दूरध्वनी वर उपलब्ध होतीलच अस नाही पण अभ्यासपूर्वक लेख लिहिणारे भटके मित्र सोशल साईट वर सहज उपलब्ध होतात, त्यांना सहज फोन करू शकता, भेटू शकता. जाण्यापूर्वी भौगोलिक परिस्थितीची सविस्तर माहिती गोळा करावी, गडावर पोहचण्यासाठी किती वाटा आहेत , त्यातील परिचित, चोरवाटा याची माहिती गोळा करणे. रात्री-अपरात्री मुक्काम करायचा झाल्यास त्या परिसरातील वन्यजीवनाचा सुद्धा विचार करणे. ऐतिहासिक आणि भौगोलिक माहितीव्यतिरिक्त गडावरील वास्तूंची प्राथमिक माहिती मिळवणे गरजेच आहे. विरगळी,शरभ, दिंड्या, तोफा ,वाडे,चौक्या, बुरुज , तटबंदी, सोपान,  फांजी, चोर दिंड्या, पाण्याची टाक, अन्य दुर्गअवशेष यांची माहिती व प्रकार समजून घेणे. (नाहीतर  ज्याच्या बाजूला जाऊन फोटो काढतोय त्याला काय म्हणतात हेच माहिती नसायचं.) सोबत गड अन परिसराचा नकाशा असणे आवश्यक आहे .गडकिल्ल्यांच्या दुरवस्थेमुळे गड नुसता फिरणे सुद्धा जिकरीचे होऊन बसले आहे . प्रबळगड सारखा किल्ला तर आपण नकाशाशिवाय फिरणे अशक्यप्राय, गडावर असलेल्या जंगलामुळे १०० मीटर पलीकडे वाट दिसतच नाही त्यामुळे नकाशा योग्य दिशादर्शकाची भूमिका बजावतो. नकाशामुळे इच्छित स्थळ नियोजित वेळेत शोधण्यासाठी हातभार लागतो अन अभ्यास नियोजनबद्ध पार पडतो.

स्थानिक माणूस म्हणजे सगळ्यात चांगला गाईड …त्याच्याबरोबर मैत्री करावी, लहान मुले  असतील आपल्याजवळचा खाऊ त्याला द्यावा, तिकडे उपजीविकेसाठी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा मल विकत घेऊन बोलते करावं ( अनुभवाने सांगतो आजीबाईचं एक ग्लास ताक घ्या अन बघा रानवाटा कशा कळतात ते ), शक्य होत असेल तर त्याच परिसरातील मित्र आठवावे अन त्यांना घेऊनच जाव.( स्थानिकांचा भ्रमंतीसाठी खूप फायदा होतो). स्थानिक लोकांमध्ये असलेल्या दंतकथा नित समजून घ्याव्या , जरी ह्या दंतकथा वैज्ञानिक पातळीवर तोलून पाहिल्यास निरर्थक  वाटत असल्यातरी त्याच्या मुळात इतिहास दबा धरून बसलेला असतो. दंतकथा बौद्धिक आकलनाने इतिहास अन भूगोलात पडताळून पाहणे.

तसा हा सह्याद्री २४ तास १८ काळ भटकण्यासाठी साथ देतो (अर्थात त्याचा पूर्ण सन्मान केला तरचं). एक दुर्गअभ्यासकच्या दृष्टीने सह्याद्रीमध्ये उतरयच झाल्यास उत्तर हिवाळा ते  मान्सूनपूर्व काळ हा  उत्तम ठरतो, कारण एक मान्सून मध्ये वरून राजा अन हिवाळ्यात धुकेश्वर महाराज दुर्गावशेष व रहाळ परिसर व्यापून टाकतात तसेच कारण दोन याच काळात सह्याद्रीची सौंदर्यमोहिनी भूगोलात इतिहास धुंडाळू देत नाही. पण मावळ्यांची अंगातली रग अन थरार अनुभवायचा असल्यास पर्जन्य काळाशिवाय गत्यंतर नाही . याउलट उन्हाळ्यात हेच गडकिल्ले , डोंगरवाटा अभ्यासाला वाव देतात, ऐतिहासिक पुरावे सहज डोळ्यासमोर आणून ठेवतात. उरली चिंता सुर्यानारयाणाची तर काळजी नसावी तीतेही सह्याद्रीची गिरिशिखरे थोरल्यावाणी सावली धरतात. गडावर पोहचण्यासाठी एकापेक्षा जास्त मार्ग नक्कीच असतात, तेव्हा गाद चढताना एक मार्ग व उतरताना दुसराच मार्ग पायाखालून घाला. यातुन गडाचा आवाका लक्षात येईल अजूनही बऱ्याच गोष्टी शिकता येतील.

गडावर जायचं म्हणून काहीही घेऊन जायचं नाही. गडावर जातांना आपल्या गाठोड्यात मुबलक पाणी (गडावर पाण्याची सोय असल्यास गडावर पोहचण्यासाठी लागेल एवढच घ्याव, उगीच ओझं वाढवू नये ), होकायंत्र, मोजमापक, चटणी भाकरीसारखा मजबूत आहार, सुखा खाऊ ,दोरखंड (गरज पडल्यास असाव), रानवाटा फिरण्यासाठी योग्य वस्त्र आणि बूट, मुक्कामी असल्यास घरात झोपण्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक गोष्टी, आग पेटवण्यासाठी लाख, लायटर, एक गारबेज पिशवी  इ.. अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये भ्रमणध्वनी (मोबाईल) एकटाच काफी आहे. याद्वारे दुर्ग वस्तूंची नोंद माहितीसहित संकलित करता येते. इंटरनेटने साथ  दिल्यास तत्काळ माहिती मिळवता एवम पसरवता येते.

गडकिल्ले हे म्हणजे छत्रपतींचे अंश आहेत, मावळ्यांचा त्याग आहे त्यामुळे त्याचं पावित्र्य राखणे हे आपले कर्तव्य आहे. उगाचच ट्रीप म्हणून किल्यांवर जाऊन पार्ट्या करणे, वेडेवाकडे फोटो काढणे, कचरा करणे टाळा. एकतर गडावरील कचरा उचलायला कमीपणा येत असेल कचरा करू तरी नका. रानटी झाडांच्या बिया जरूर न्या , गडाच्या माळरानावर टाकून सह्याद्रीवर त्यांना पोसायची जबाबदारी ढकलून या, बहुतांशी गडावर पाण्याचा मुबलक साठा आहे, त्यातील पाणी गडावरील रोपट्यांना घाला, गडावरील टाक्यामध्ये घन टाकणे , पोहणे असे गैरप्रकार करू नका. शिवकालीन जल व्यवस्था आजच्या भूजल अभियंत्यांना सुद्धा तोंडात बोटं घालायला लावील, शक्य झाल्यास त्याचा वापर भविष्यात करता येतो का याचा अभ्यास करा.. प्रत्येक गडाला एक विशिष्ट महत्व असते, त्याचा विस्तार करून महोत्सवाचे स्वरूप देण्यासठी प्रयत्न करा. गडावरील बुरुज, तट हे शौर्याचे प्रतिक आहेत त्याचं रुपांतर प्रेमाचे प्रतीक होऊ देऊन नका , कोणी करीत असेल त्याला मज्जाव करा. गडावर विलोभानीय कोरीवकाम पाहायला मिळत, त्यात आपल्या कौशल्याची भर पडणार नाही याची दक्षता घ्यावि . शक्यतो गडावर अन्न शिजवू नये (तशी गरज पडल्यास कचरा व बाकीच्या गोष्टींची योग्य ती  विल्हेवाट लावावी.). मद्यपान, अशोभनीय (अश्लील)उद्योग करू नये अन कोणी करत असले तर त्याला गांधी अनि गरज पडल्यास सावरकरांची आठवण करून द्यावी. शक्य होईल तेवढे गडसंवर्धनाची काम करावीत.

शिवकाळात तोफांचे मार सहन करणारे हे अभेद्य गडकिल्ले आज प्लास्टिकच्या माराने ढासळू लागले आहेत, आर्त टाहो फोडत आहेत. तेव्हा खेळवा आपल्या धमन्यांमध्ये रक्त अन परत मिळवून द्या स्वराज्याला हे पूर्वीचे दुर्गवैभव…

गडकिल्ले राहिले तर इतिहास हा मूर्त स्वरुपात जिवंत राहील. आज हा वारसा आपल्या पिढीकडे आहे तो व्यवस्थित करूनच पुढच्या पिढीला हस्तांतरित अन तसे न घडल्यास माझा राजा फक्त पुस्तकांत, कथा-कादंबऱ्यामध्येच शिल्लक राहील.

शक्य होत असल्यास जाणकार मंडळींसोबत भटकंती करावी. ज्ञानात भर तर पडेलच पण भटकंती केल्याच सार्थक नक्कीच होईल
गड कसा पाहावा – एक तंत्र ह्या विषयला आपण व्यापक स्वरूप दिले पाहिजे. कारण हि खरी काळाची गरज आहे

लोभ असावा.

Whatsapp+
Facebook
Instagram
Youtube
Twitter