A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::open($save_path, $name) should either be compatible with SessionHandlerInterface::open(string $path, string $name): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 132

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::close() should either be compatible with SessionHandlerInterface::close(): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 292

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::read($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::read(string $id): string|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 166

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::write($session_id, $session_data) should either be compatible with SessionHandlerInterface::write(string $id, string $data): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 235

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::destroy($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::destroy(string $id): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 315

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::gc($maxlifetime) should either be compatible with SessionHandlerInterface::gc(int $max_lifetime): int|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 356

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

बा रायगड परिवार,महाराष्ट्र

ब्लॉगप्रस्तरारोहण – सर्वांग माहिती

प्रस्तरारोहण – सर्वांग माहिती

खर, तर शेवत्या घाटाजवळ रायलिंग पठाराच्या कुशित वसलेला हा देश म्हणजेच घाटमाथा व कोकणाला जोडणारा महत्वाचा दुवा.तसेच शिवकालापासून ते अगदी पंत प्रतिनिधिंच्या कालखंडापर्यंत कैदखाना म्हणून जनमाणसात प्रचलित असलेला हा निसर्गत: बेलाग व दुर्गमता लाभलेला सुळका सर करुन एकदा त्याच्या माथ्यावर विराजमान होण्याच प्रत्येक दुर्ग भटक्याच स्वप्नच असते.
या निमित्ताने का होईना या आजकालच्या तरुणाईची पाऊले कधीकाळी शौर्याच्या खाणाखुणा व बाप जाद्यांच्या रुधिरबिंदूंनी पावन झालेला या सह्याद्री व त्यावर वसवलेले गौरवशाली गडकोट धुंडाळतो आहे.पण,असा ट्रेकिंगचा व्यावसाय करणार्यांनी गडरहाळातील लोकांकडेही लक्ष दिले पाहिजे.त्यांच्या पोटापाण्याचाही विचार केला पाहिजे. निदान आपण ज्यांच्या जिवावर कमावतो त्यांचाही विचार हा प्रकर्षाने व्हायलाच हवा.
*ट्रेक ऑर्गनाईजर संस्थांनी खालील काही बाबी पाळने महत्वाचे आहे-
१)प्रथमत आपण ट्रेकिंसाठी नोंदणी केलेल्या
सदस्यांच्या शारिरिक शक्तीचा एनालेसिस करावा.
त्याने यापुर्वी कधी भटकंती केली आहे काय?
त्याला निदान प्राथमिक सुरक्षेची माहिती आहे काय?
२)त्याचा रक्तगट नोंदवून घ्यावा.
३)त्याचा राहता व मुळ पत्ता नोंदवावा.
४)त्याचा आयडी प्रुफचे झेरॉक्स घ्यावे.
५)त्याच्या घरचा एमरजेन्सी फोन क्रमांक घ्यावा.
६)गडावर आपल्या समुहाकडून कुठल्याही प्रकारचा कचरा होणार नाही.याची दक्षता घ्यावी.
७)बिस्लेरी नेणे टाळावे,थर्माकॉलच्या प्लेट नेणे टाळावे.त्याऐवजी, ताट वाटी व २ लिटरची पाणि पिण्याची कायमची बॉटल घेण्यास सदस्यांना सुचना द्याव्यात.
८)आपल्याकडून वन्य प्राण्यांस डिस्टर्ब होईल अशा प्रकारचे वाद्यसंगित(डिजे) अथवा आरडा ओरडा गोंगाट होणार नाही याची दक्षता घ्यावी.
९)मी हल्ली गडांवर सर्रास पाहतो.
सर्वच गडांवर वानर नाहीत.पण,ज्या गडांवर आहेत.त्या ठिकाणी पहायला मिळते. की,त्या वानरांना खाऊ देतात व मग त्यांना काठिने अथवा दगडाने मारतात. शेवटी तो हि एक जिवच आहे.त्याच्यावर हल्ला झाला तर तो प्रतिकार करणारच ना?
पण, काहि महाभागांना त्याचीही मज्जा वाटते.
सोबत एखाद्या मित्र,मैत्रिणीला आणलेलेच असते. मग, मी कसा वेगळा, धाडसी,शूर हे दाखवण्याच्या नादात याचेच ‘माकडचाळे’ सुरु होतात.परिणामी प्रेमळ व फक्त पोटासाठी खाऊ मिळावा या आशेने जवळ आलेली ती वानरे मग आक्रमक होतात.
बर,वानराने जर का कानाखाली मारली तर त्याचे असे काही वळ गालावर उठतात की त्यातून रक्तच बाहेर येते.
(मला अनुभव नाही. पण, घडलेली घटना डोळ्याने पाहिली आहे.)
तेव्हा,त्यांना फक्त खाऊ द्यावा देता आला तर…
नाहितर मुकाट्याने पुढे जावे.त्यांना त्रास देण्यात धन्यता मानू नये.
१०)तुम्ही ज्या किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी जात आहात.त्या गडाच्या पायथ्याच्या गावात तुम्ही किती सदस्य आहात.तुमचे वेळेचे नियोजन तेथील गावकर्यांस सांगून मगच पुढे जावे.
११)तेथील गावातील एक जुना जाणता वाटाड्या नेहमी सोबत ठेवावा. कारण, आपण फक्त पुस्तके वाचतो. पण, या लोकांनी तेथील भूगोल लहानपणापासूनच अभ्यासलेला असतो. त्यामुळे, नवनविन काही वास्तू गुहा, टाके, मंदिरे, शिल्पे इ. गोष्टी नव्याने पहायला मिळतात.

वरील डाटा व प्राथमिक सुचना पाळल्याने
होत काय की
तुम्हाला त्रास होत नाही.
काही अनुचित प्रकार घडला
दुखापत झाली.
तर,रक्त वगैरे देण्याची गरज पडल्यास किंवा अन्य काही घटना घडल्यास वरील डाटा उपयोगी पडतो.तसेच गावकर्यांना तुमची पुरेपूर कल्पना असल्यास व तुम्ही रस्ता भटकल्यास त्यांचीही काही मदत होऊ शकते.

*सोबत लागणार्या साहित्याची यादी-
१)पोशाख हा सैलसर व संपुर्ण अंग झाकेल असा असावा.निसर्गात अनेक प्रकारचे विषारी व बाधित किटक, वनस्पती असतात. त्यांचा संपर्क आपल्या शरीराला झाल्यास इंफेक्शन होण्याचा धोका असतो.
२)सोबत सुका खाऊ व दोन ते तीन लिटर पाणी कायम असू द्यावे.
३)चाकू
४)विजेरी(टॉर्च)
५)जास्त जंगलात जात असाल तर एनिमल स्प्रे
६)हिवाळ्यात उबदार कपडे तर पाऊसाळ्यात रेनकोट वापरावे.
७)सोबत एक लाईटर असु द्यावे.
८)एक नोंदवही पेन जवळ बाळगावा.
९)शक्य झाले तर पेंट, रेडीयम किंवा खडू.
तुम्ही ज्या मार्गाने जात आहात त्या मार्गावर खुणा करत चला. म्हणजे रस्ता भटकलात तरी पुन्हा या खुणांच्या आधारे तुम्हास माघारी येता येईल.
१०)हे सामान वाहून नेण्यासाठी एक मजबूत पिशवी.

___हल्ली अनेक प्रकारचे तंत्रद्नान वापरुन अनेक बेलाग व अवघड सुळके किंवा गडांवर कृत्रीम चढाई केली जाते. गिर्यारोहणात प्रामुख्याने खालील प्रकार पडतात.

अ) डोंगरयात्रा-
या प्रकारात कुठल्याही प्रकारच्या कृत्रिम साधनांचा आधार घेण्याची गरज नसते.या प्रकारात पायर्या असलेले किल्ले चढाई किंवा सोप्या टेकडींहून पायी चालत निसर्गातील विविध स्त्रोतांतून भटकने होय.

ब) मुक्त प्रस्तरारोहन( Free climbing)
हा प्रकारही डोंगरयात्रेसारखाच आहे. कोणतीही कृत्रीम साधने न वापरता सोप्या व नैसर्गिक खाच खळगे लाभलेल्या कातळावर(खडकावर) चढाई करणे होय.डोंगरयात्रेत अशा प्रकारची चढाई थोडयाफार प्रमाणात करावी लागते.मात्र या चढाईसाठी कातळावर निसर्गता खाच खळगे उपलब्ध असणे गरजेचे असते.
निसर्गाने माणसाला चार पॉईंटस बहाल केलेले आहेत.
दोन हात
दोन पाय
या प्रकारात अरोहकाला याच चार टोकांचा वापर करुन व थ्री कॉन्टॅक्ट पद्धतीने चढाई करायची असते.

क)कृत्रीम कातळारोहण(आर्टिफिशिअल क्लाइंबिंग) –
ज्या ठिकाणी निसर्गत: उपलब्ध खाच खळगे नसतात. त्याठिकाणी या प्रकारचे अरोहण करावे लागते.
कृत्रीम अरोहणासाठी लागणारे साहित्य-

१)पोशाख-
डोंगरयात्रेत वापरला जाणारा पोशाख याहि प्रकारात वापरता येतो.
२)शूज-
डोंगरयात्रेत वापरले जाणारे ‘हंटर’ शुज या ठिकाणी उपयोगी पडत नाहित.सपाट परंतू जाड तळवे असणारे कॅनव्हास शूज अवश्यक असतात.
३)रोप-
साधारणता ८ एम एम व
१०.५ किंवा ११ एम एम जाडीचा नायलॉन किंवा पॉलिस्टर मटेरिअलचा दोर अवश्यक असतो.
त्याची लांबी हि तुम्ही अरोहण करत असलेल्या
कातळाच्या किंवा गडाच्या उंचीच्या अंदाजाने घ्यावी लागते.
रोपच्या कॅपासिटिचा एक तक्ता मी येथे देतो.

*नायलॉन मटेरिअलचा रोप
साईझ वजन किंवा ताण घेण्याची क्षमता
१)6mm. 600 kgf
२)8 mm. 1300 kgf
३)9mm. 1800kgf
४)10.5mm.(Dynamic) 2300 kgf

*पॉलिस्टर मटेरिअल रोप-

साईझ| वजन घेण्याची क्षमता
१)8mm. 1000kgs
२)10mm. 1300 kgs(main
Sheet)
३)12mm.(MATT) 1600kgs(main
Sheet)

४)12mm(SHINY) 3300kgs(mainsheet)

5)10mm
Spectra Braid. 4500 kgs(main sheet)

४)पिटॉन व बोल्ट
कातळाच्या खाचेत ठोकायची पट्टी किंवा खिळा(बोल्ट)
५)पिटॉन हॅमर-
पिटॉन ठोकण्यासाठी हातोडा

६)चोकनट-
कातळाच्या खाचेत अडकविण्याचा खडा

७)कॅरॅबिनर-
झडप असलेली धातूची कडी
यात अनेक मटरिअलचे कॅरॅबिनर असतात.
लोखंड
हलक्या वजनाच्या धातूचे
कार्बन फायबर
या प्रत्येक धातूची वजन घेण्याची क्षमता वेगवेगळी असते.
यात लोखंडाचा कॅरॅबिनर साधारणता 23KN क्षमतेचा असतो.

*1KN=101.972 kgf

८)स्लिंग
९)स्नॅप स्लिंग
१०)हेल्मेट
११)बिले प्लेट
१२)डिसेंडर
*तुम्हाला रोपच्या काही गाठी(नॉट) मारता यायला हव्यात.
“थंब नॉट,रिफ व फिशरमन नॉट,फिगर ऑफ एट, बो लाईन” इत्यादी नावांनी या नॉट ओळखल्या जातात.याचे कौशल्य अत्मसात करण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शक व सरावाची गरज असते.

*कातळारोहणाची पद्धत-
सर्व प्रथम यासाठी तुमच्याकडे एक कसलेली व जिवाला जिव देणारी एक टिम असायला हवी. ज्यात सपोर्ट टिम,लिड टिम वगैरे प्रभाग करत सुसज्ज करायला हवी.जो सुळका अथवा कातळ अरोहण करायचा आहे. त्याची रेकी व पुरेपूर अभ्यास करुन.
मग, एखाद्या दिवशी वरील सर्व साहित्य एका मजबूस हावर सॅक मध्ये एकमेकांना वाटून भरुन घ्याव.सुरक्षित त्या ठिकाणावर पोहचाव.

*आता प्रत्यक्ष अरोहण कसे करतात ते पाहू.
अरोहणासाठी तीन सदस्यांच्या टिमची अवश्यकता असते.पहिला जो लिडर असतो व बाकीचे बिले देत असतात.लिडर हरनेस,पिटॉन,बोल्ट, पिटॉन हॅमर,कॅरॅबिनर,डिसेंडर, पाणि बॉटल इ. साहित्य कमरेला अडकवून व दोर कमरेस घट्ट बांधून अरोहणास प्रारंभ करतो.जो पर्यंत फ्री क्लाईंबिंग करता येते तोपर्यंत करतो व कठीण श्रेणीचा कातळ.म्हणजे, विना खाच खळग्याची एक सपाट नैसर्गिक भिंत लागली की,त्यात तिथेच जागा पाहून पिटॉन किंवा बोल्ट हातोडीच्या सहाय्याने ठोकतो.
आता यात नविन तंत्रद्नानाची भर पडली आहे. कार्बन फायबरचे बोल्ट वापरले जातात.ते ठोकण्यासाठी छोट्या ड्रील मशिनच्या सहाय्याने होल केले जाते.त्यात केमिकलच्या कांड्या टाकून बोल्ट ठोकला जातो. बोल्टच्या दबावाने त्या केमिकल कांड्या आतच फुटतात व ते केमिकल कातळ व बोल्ट यांचा असा काहि जोड निर्माण करते की, पुढील ५० वर्षे तरी हा जोड कायम राहतो व केमिकल काहि क्षणातच आपले काम फत्ते करते.मग, त्या बोल्टच्या आधारे लिडर वर जातो. एखाद्या टप्प्यावर सेफ होतो.जागा नसेल तर त्या ठोकलेल्या बोल्टलाच कॅरॅबिनरच्या सहाय्याने एक शिडी अडकवतो व त्याच्या आधाराने वरचा बोल्ट ठोकतो.लिडरच्या कमरेला बांधलेला रोप कॅरॅबिनेरच्या सहाय्याने त्या बोल्ट मध्ये अडकवत वर वर जातो.
अशावेळी लिडर पुर्णता असुरक्षित असतो.
तो जितका वर गेला आहे तितक खाली येऊ नये म्हणून,तो ‘रनिंग बिले’ घेत पुढे सरकतो. म्हणजे,लिडर प्रत्येकी दोन मिटर अंतरावर पिटॉन ठोकून किंवा चोक अडकवून त्यात कॅरॅबिनर अडकवून त्यातून रोप ओवून वर जातो.म्हणजे, जरी त्याचा तोल गेला व तो पडला तरी त्याला डबल बिले मिळतो. एक सह्यमित्र अरोहकाने दिलेला व दुसरा ठोकलेला पिटॉन त्याला आधार देतो. त्याला खाली पडू देत नाही.
असे ठराविक अंतर पार केला कि,तो स्वत:स अँकर करतो.(म्हणजे सुरक्षित टप्प्यावर तो स्वत:त सेफ करतो) व मग दुसर्या अरोहकास बिले देत रोपच्या सहाय्याने वरच्या टप्प्यावर घेतो.आणखी टप्पा झाला की तो दुसरा तिसर्याला बिले देत वर घेतो.हा क्रम कातळ अरोहण पुर्ण होई पर्यंत चालू असते.कधी कधी अति उत्साहि अरोहक लिडरचे न ऐकता आपला कॅरॅबिनर सांगूनहि रोप मध्ये अडकवत नाहित. अर्थात ते पुर्ण अनसेफ असतात व खाली पडून इजा होण्याची शक्यता बळावते.तेव्हा, लिडरच्या सुचनांचे पालन केले पाहिजे.
आता कडा पुर्ण अरोहण झाल्या नंतर उतरण्यासाठी रॅपेलिंग (दोरीच्या सहाय्याने सरपटत खाली येणे.) याचे दोन प्रकार पडतात.
१)रॅपेलिंग –
या प्रकारात तुम्हाला दोर कड्याच्या वरच्या टोकाला मजबूत अँकर करायचा असतो.तुमच्या हरनेसला सोबत आणलेला डिसेंडर कॅरॅबिनरच्या सहाय्याने जोडायचा असतो व रोपच्या सहाय्याने खाली यायचे असते.
डिसेंडरचे दोन तीन प्रकार आहेत.
१)पुर्वी चैन पुल्ली सारख्या दिसणार्या एका उपकरणात दोर कायमचा अडकवून ठेवत व त्याचा उपयोग करत पण हि पद्धत फार किचकट व वेळ खाऊ असते.मात्र जास्तवेळ त्याच ठिकाणावर थांबायचे असल्यास हि पद्धत वापरता येते.इंडस्ट्रियल लाईन मध्ये रंगकाम किंवा अध्यंतरी करण्यात येणार्या कामांसाठी याचा उपयोग होत होता.
२)फिगर ऑफ एट मेन्यूअल डिसेंडर-
हा एक आठाच्या आकाराचा बनवलेला अजोड प्रकारचा असतो.यात रोपचा वापर कसा करायचा याच मात्र तंत्रद्नान तुम्हाला प्रत्यक्षरित्याच घ्यावे लागेल.यात खालच्या बाजूस ‘फायरमन बिले’ घेता येतो. म्हणजे जरी तुमचा हात निसटला तुम्ही स्विंग झालात.ओव्हरहँगला सपोर्ट मिळाला नाहि किंवा अन्य कारणे.
तरी, खालचा बिले मन तुम्हाला कंट्रोल करतो.याचा वापर बिले देण्यासाठीही होतो.म्हणजे,एखाद्या टप्प्यावर तुम्ही डाऊन क्लाइंबिंग करत आहात व टप्पा मोठा असेल तर, जास्तिची दोरी तुमच्या हरनेसला जोडून ती या फिगर ऐट डिसेंडर मधून ओवून घेतली जाते.यामुळे, तुम्हाला बिले देणार्या अरोहकावर ताण पडत नाही.तो तुम्हास आरामात खाली उतरवू शकतो.
३)अॅटो डिसेंडर-
हे आता आता नविन आलेले उपकरण आहे. यात रोप सेट केला जातो.या उपकरणास एक कंट्रोल लिवर असतो.जेव्हा, हा लिव्हर तुम्ही ऑपरेट कराल तेव्हाच हे उपकरण प्ले होते.अन्यथा ते तुम्हास आहे त्याच जागेवर स्थिर ठेवतो.

२)कमांडो रॅपेलिंग-
साध्या रॅपेलिंग मध्ये आपले तोंड हे कड्याच्या दिशेने वर असते.तर, या प्रकारात तोंड खाली जमिनिच्या दिशेने असते.मात्र हा प्रकार जास्त रिस्की आहे.अत्यंत सराव व मार्गदर्शनाने हि कला शिकता येते.

रॅपेलिंग हे तंत्रद्नान जरी थरारक अनुभूती देत असले तरी, पुर्णत: रोप,डिसेंडर, कॅरॅबिनर,अँकर यांवर अवलंबून असावे लागते. त्यामुळे,एक वेगळा रोप हरनेसला लावून तो वरच्या लिडरच्या हातात असला म्हणजेच सेप्टी कंट्रोल बिले हितावह ठरतो.

__सर्वात महत्वाचे म्हणजे आपण ज्या ठिकाणी अरोहण करणार आहोत. तेथील प्राणिमात्रांची,तेथील माणसांचा माणसांचा आपण सन्मान केला पाहिजे.कातळारोहणाचे कोणतेही तंत्र शिकताना सक्षम शरीर एकाग्र मन व संयम तसेच योग्य नियोजन व जिद्द याच्या बळावर कातळारोहणाचे हे तंत्रहि सहज अात्मसात करता येण्याजोगे आहे.
यातही काही गोष्टी आहेत ज्या फक्त अनुभवातूनच आत्मसात करता येतात. डोंगरयात्रेत चालढकल किंवा ढिलाई खपवली जाते. या प्रकारात असे काहि चालत नाही. असे केल्यास एकतर गंभिर दुखापतीला सामोर जाव लागत किंवा कधी कधी प्राणालाही मुकाव लागते.
यात आपण वापरत असलेली साधने वेळो वेळी तपासायला हवीत.त्यांची निगा राखणे महत्वाचे असते.योग्य कंपनीची निवड.त्याचे द्नान असणे अवश्यक असते.
मी वर दिलेली माहिती हि प्राथमिक स्वरुपातील आहे.यात खुप काही बाबी राहून गेल्यात.त्या वाचून नाहि तर अनुभवातून शिकाव्या लागतात.
__अरोहणाचा आणखी प्रकार आहे. तो म्हणजे,
*हिम पर्वत यात्रा व हिम बर्फारोहण
परंतू,

“भव्य हिमालय तुमचा अमुचा , केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा,
तुमच्या अमुच्या गंगायमुना, केवळ माझी भिंवरथडी,
प्यार मला हे कभिन्न कातळ ,प्यार मला छाती निधडी,
मधुगुंजन लखलाभ तुम्हाला, बोल रांगडा प्यार मला”

म्हणून थांबतो…
(चुक भूल देणे घेणे.जाणकारांनी आणखी मार्गदर्शन करावे हि आपेक्षा)

धन्यवाद…

विशेष आभार
राहुलराव साबळे

Whatsapp+
Facebook
Instagram
Youtube
Twitter