A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::open($save_path, $name) should either be compatible with SessionHandlerInterface::open(string $path, string $name): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 132

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::close() should either be compatible with SessionHandlerInterface::close(): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 292

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::read($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::read(string $id): string|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 166

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::write($session_id, $session_data) should either be compatible with SessionHandlerInterface::write(string $id, string $data): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 235

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::destroy($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::destroy(string $id): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 315

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::gc($maxlifetime) should either be compatible with SessionHandlerInterface::gc(int $max_lifetime): int|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 356

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

बा रायगड परिवार,महाराष्ट्र

ब्लॉग



स्थानिक प्रश्न सोडून 'गडसंवर्धन' का ?

जय शिवराय बंधूंनो ! सदर लेख हा गडसंवर्धनासंबंधित माहिती देणारा अथवा इतिहासाला हात घालणारा नसून सद्यस्थितीत तुम्हाला तो कसा जोडला जातो हे सांगण्याचा तोडका प्रयत्न माझ्या हातांनी मी केला आहे. काही चूलभूक झाल्यास किंवा कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू मुळीच नाही. तसं वाटल्यास नक्कीच कळवावे ही विनंती !

समाजासाठी झटणाऱ्या प्रत्येक हातांनी एका ठराविक वेळेनंतर आपले एक क्षेत्र निश्चित करून त्या क्षेत्रासंबंधी विधायक हेतू साठी ते हात काम करायला लागतात. आपल्या आसपास काम करणाऱ्या प्रत्येकाला हे लागू पडते. आपणही -गड संवर्धन करणारेही- त्यातच मोडतो. 

समाजातील मूलभूत प्रश्नांसाठी पुढे येणाऱ्या, जरा स्पष्टच बोलायचे झाले तर नुसतंच व्यवस्थेला दोष देत काहीच न करणाऱ्यांपेक्षा छोट्या असो वा मोठ्या स्वरूपात आपापल्या परीने प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाचे स्वागतच !

समाजातील विषय वेगवेगळे,  समस्या वेगवेगळ्या, त्यासाठी कार्यरत असणारी फळी वेगवेगळी. कुणी सामाजिक संस्थांच्या रूपाने, तर कुणी वैयक्तिक. या पूर्ण वर्तुळामध्ये, वर्तुळातील वेगवेगळ्या अंगांमध्ये,  गडकिल्ले संवर्धनासाठी झटणाऱ्या हातांना बऱ्याचदा संशयित स्वरूपात पाहिलं जातं.

अनुभव वैयक्तिकही आणि इतरांचे ऐकिवातही. "गडावर हिंडायला जायला कुणाला नाही आवडणार, संवर्धन फक्त नावाला..",  "बरं गेलं तर गेलं, फोटो काढून दाखवण्याची काय गरज..?",  "गडकिल्ले एखाद्या स्वतःच्या मालकीसारखी वापरायची हा संवर्धनामागचा उद्देश.." असे कितीतरी प्रश्न आपल्यासमोर उभे केले जातात. इथे साहजिकच त्या उपरसोंड्यांना गृहीत धरून हा लेख मुळीच नाही, जे स्वतः कोणत्याच सामाजिक कार्यात सहभाग नाही घेत पण इतरांच्या कामावर बोटं उचलायला कायम तयार..! हा लेख त्यांना अनुसरून आहे जे खरोखर प्रामाणिकपणे समाज कार्य करताना वैचारिक मतभेद म्हणून गडकिल्ले संवर्धनावर प्रश्नचिन्ह उभे करतात. आणि त्यांच्या शब्दांनाही महत्व येतंच कारण एका विचाराअंती त्यांनी हे प्रश्न विचारलेले असतात. त्यातूनच हा लेख !

समोर येणाऱ्या प्रश्नांपैकी विचार करायला लावणारा एक प्रश्न माझ्यापुढे आला. आणि एवढा गांगरलो की त्यावेळी माझ्याकडे त्याचं उत्तर नव्हतं. चर्चा साहजिकच अस्सल वैचारिक लोकांची होती तर उडवाउडवीची उत्तरं देऊन चालणार नव्हतं. तर प्रश्न हा होता की, "महत्वाच्या  स्थानिक प्रश्नांना बगल देऊन गडकिल्ले संवर्धनात ऊर्जा वाया घालवून आज काय साध्य होणार?" 

मी उत्तरलो, "आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याच्या त्या शेवटच्या पाऊलखुणा आहेत. तो वारसा जपायला हवा म्हणून."

प्रतिप्रश्न आला, "बरं एक सांग महाराजांनी स्वराज्य उभं केलं ही त्यावेळची स्थानिक गरज होती. आजची महत्वाचे दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांसारखे ज्वलंत प्रश्न सोडून गडसंवर्धनाला जाणं महाराजांना किती पटलं असतं याचा तूच विचार कर. वेळ असता, स्थानिक प्रश्नांच्या तुलनेत मनुष्यबळ खूप जास्त असतं, तर नक्कीच हे मलाही पटलं असतं. पण तीच ऊर्जा, तेच मनुष्यबळ, तुटपुंजा पैसा हे सर्व जे स्थानिक प्रश्न 'जे की वास्तव दृश्य स्वरूपात आहेत' यांच्यासाठी वापरला तर.. उलट त्या प्रश्नांसाठी होणाऱ्या मेहनतीला बळ येईल. आणि त्यातून काही साध्यही होईल." 

हा प्रश्न जेव्हा त्याने विचारला तेव्हा 'त्यातून काही साध्यही होईल." यावर त्याचा खोचक जोर होता. पुढे मलाही पटलं, की वारसा जपावा म्हणून सद्यस्थितीतील प्रश्न सोडून संवर्धनामागे जाणे म्हणजे 'खिशात दमडी नसताना कोंबडी घ्यायचा विचार करण्यासारखे आहे'. "मग का करावं गडसंवर्धन?" हा प्रश्न माझ्याही मनात घर करायला लागला. कारण माझं उत्तर मलाच नाही पटलं. असं वाटायला लागलं की आपल्या एवढ्या दिवसाची मेहनत खरंच निरर्थक होती की काय..? विचारागणिक दिवसामागे दिवस गेले, संबंधितांशी चर्चा झाली, पुस्तकं चाळली, स्वतः लिहिलेले संवर्धन मोहीमांतील अनुभव वाचले अन शेवटी उत्तर सापडलंच आणि ते ही असं की जे इतर सामाजिक प्रश्नांना सामावून घेणारं होतं. एव्हाना गडसंवर्धनाबाबत जो विचार मी कधीच केला नसता ते मला त्या चर्चेतून मिळालं होतं. योग्य वैचारिक बुद्धिवाद्यांसोबत केलेल्या चर्चेचे हेच काय ते फलित. 

कॉल फिरला. मी विचारलं, "दादा त्यादिवशी तू विचारलं होतं बघ गडसंवर्धनाबद्दल. जरा त्याविषयी बोलायचं होतं. भेटूया का?"

भेटायचं ठरलं. नेहमीचाच कट्टा. 

दादा : "जय शिवराय ! मोहन ती गोष्ट तू अजूनही मनात धरून ठेवली आहेस."
मी : "जय शिवराय दादा ! तू विचारलेला प्रश्न खरंतर मलाही कोड्यात पाडून गेला होता. पण हो ! बऱ्याच विचाराअंती मला त्याचं उत्तर सापडलंच."
दादा : "बरं सांग. तुला काय कळलं ते. आवडेल मला ऐकायला." 
मी : " बरं दादा ! कल्पना कर की तू एका जंगलात अडकला आहेस. लख्ख रात्र. वरून धो धो पाऊस. तुला काहीच कळत नाहीये कुठे जावं. दोन-तीन दिवस झाले अन्नाचा एक कणही तुझ्या पोटात गेलेला नाही. सतत धावपळीत पावसाने रस्ता निसरडा झाल्याने तू बऱ्याचदा पडला. त्यामुळे मुक्का मार आणि काटेरी जंगलाने ही तुला बऱ्याच जख्मा झाल्या आहेत."

माझा बोलणं तोडत दादा उत्तरला, "थांब थांब थांब ! तू विसरलास का माझा प्रश्न काय होता ते?  मी थेट गडसंवर्धनावर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. आणि तुझं हे 'जंगल-पाऊस-त्यात अडकलेला मी' हे काय चालू आहे. तू शुद्धीवर आहेस ना.? या सर्वांचा त्याच्याशी काय संबंध.?" 

मी : "दादा जो संबंध आहे तेच उत्तर आहे. पण त्यासाठी मी सांगतो तशी कल्पना तर कर. तर कुठे होतो मी? हा ! सतत पडल्याने, काटेरी जंगलाने तुला बऱ्याच जख्मा झाल्या आहेत. तू पूर्णपणे हतबल झाला आहेस परिस्थितीसमोर. शरीरासोबतच मानसिकरित्या तू पूर्णपणे खचला आहेस. तू आटोकाट प्रयत्न करत आहेस जख्मा भरण्याचा, मुक्कामार सांभाळून चालण्याचा.. पण प्रयत्न करूनही तुला चालता येत नाहीये. जंगली प्राण्यांचे आवाज तुझ्या मनात दहशत करू लागलेत. चक्रावून टाकणारं दिशाहीन जंगल तुझ्या डोळ्यासमोर गरगर फिरत आहे. याच गांगरलेल्या अवस्थेत आता तू पूर्ण आशा सोडतोस. कारण तुझ्या नजरेत तुला आता काहीच वाचवू शकत नाही. तू चक्कर येऊन खाली पडतोस." 

दादा : "मोहन, वाचव मला. मला इतक्या लवकर मरायचं नाहीए. मला बरीच कामं करायची आहेत. अरे आता कुठे सुरुवात झाली होती. अन कुठे मी या जंगलात येऊन अडकलो. मोहन वाचव मला.!"

मी समजलो दादा पूर्णपणे काल्पनिक विश्वात गेला आहे. विचार आला की दादाला शुद्धीवर आणावं पण थांबलो. कारण त्याशिवाय दादाला वस्तुस्थिती समजणार नव्हती. 

मी बोलता झालो, "दादा बराच वेळ तू तसाच पडून आहेस. एकटा. आसपास कुणीच नाही. शेवटच्या घटका मोजत. तू ही मनातून तुझा मृत्यू स्वीकारला आहेस. आता तू फक्त मरण्याची वाट बघत आहेस." 

"एवढ्यात तुला अजून 7-8 लोकांचा आवाज येतो. ते ही तुझ्यासारखे हतबल. जगण्याची आशा संपलेले. त्यांनाही कळेना की या जंगलातून कसं बाहेर पडावं. तुला उघड्या पापण्यांनी एक चित्र दिसतं.. ते हे की त्यातील दोन जण एका अशा माणसाला उचलून आणत होते ज्याचा पाय तुटला आहे. ते पाहून तूझं रक्त अजून थंड पडतं. पुढे जाऊन ते दोघेही त्या लंगड्या माणसाला घेऊन खाली पडतात. हतबल, लाचार तुम्ही सर्व. नुसता रक्ताचा खच पडलेला. तुमच्या डोळ्यादेखत मृत्यू तांडव खेळत आहे. तुमच्यावर हसत आहे. आणि तुम्ही जगण्याची आशा संपलेले मृत्यूकडे लवकर भेटण्याची याचना करत आहात. भयंकर काळरात्र !"

"एवढ्यात तुला एक आवाज कानावर पडतो. पाय तुटलेली व्यक्ती पडल्यानंतरही हार मानायला तयार नाही. मृत्यूपुढे लाचार व्हायला तयार नाही. ती व्यक्ती पडलेल्या अवस्थेत हात वर करून गर्जना द्यायला लागते. तो आवाज एवढा की उभ्या जंगलाला थरकाप उडावा. आभाळ कापून उठावं. समुद्राच्या पाण्याची व्याप्तीही ज्यापुढे कमी पडावी एवढी आक्राळविक्राळ ती  महागर्जना. ती महागर्जना होती, "हर्रर्र हरर्र महादेव.. हर्रर्र हर्रर्र महादेव.. "

"दादा ऐकताक्षणी तुझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं एका चरित्रांचं. ते चरित्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि जसं ते तुझ्या मानगुटात भिनतं, तुझ्या मनातली दहशतच धूम ठोकते. त्या पाय तुटलेल्या मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या पण शेवटच्या श्वासापर्यंत मृत्यूला डोळ्यात डोळे टाकून भिडणाऱ्या मावळ्याला पाहून तुझ्या नसानसात विराग्नि संचारते.  क्षणात महाराजांचा पूर्ण इतिहास तुझ्या डोळ्यासमोरून जातो. बोटावर मोजण्याइतपत मावळ्यांना घेऊन ज्यांनी गुलामगिरी झिडकारली होती आणि मृत्यूला (मोघलांना) आव्हान दिलं होतं. तेच शिवराय ज्यांनी इतिहास पालटला. तू क्षणार्धात पूर्ण जोर लावून 'हर्रर्र हर्रर्र महादेव'ची गर्जना देत उभा राहतो. तुला सूदही नाही की तुला किती जख्मा झाल्या आहेत की थोड्यावेळापूर्वी तू पूर्ण संपला होतास. तू सर्वांना आव्हान करतो, 'उठा मावळ्यांनो उठा ! या पृथ्वीतलावर तुम्ही माणूस म्हणून जन्मला आहात. जागे करा तुमच्यातल्या राजाला. खचून जाऊ नका. या जंगलाच्या गुलामगिरीतून आपल्याला बाहेर पडायचं आहे. रडता काय? आपल्या महाराजांनी जे करून दाखवलं होतं ते आपल्याला आज मृत्युसोबत करायचं आहे. फाडून काढा या गुलामीला. मेलो तर गर्वाने मरू आणि जगलो तर इतिहास घडवू... उठा !"

"क्षणार्धात त्या सर्व मावळ्यांच्या अंगात धगधगता प्रकाश संचारला. पुन्हा दोघांनी त्या पाय  तुटलेल्या मावळ्याला उचलून 'हर हर महादेव'ची गर्जना करत पळायला सुरुवात केली. कोणालाच त्यांच्या जखमांचं भान नव्हतं. उभं जंगल धाड धाड पावलांनी गर्जत होतं. त्या जंगलाला-त्या मृत्यूला हार मानणंच होती. कारण दादा त्यांच्यापुढे आज सुरुवातीला जंगलात आलेले भटके नव्हे तर मरणालाही न भिणारे मावळे उभे होते. मृत्यूने पराभव स्वीकारला. दादा तुम्ही सर्व एका रस्त्यावर बाहेर पडलात."

"दादा तुम्ही सर्व जंगलाच्या गुलामगिरीतून सुटला होता. आता वेळ होती घरी जाऊन विश्रांती घेण्याची, आहेत त्या जख्मा भरण्याची."

मी दादाला शुद्धीवर आणलं. 
दादा : "अरे काय हे ! कुठे आहे मी? माझ्या जखमांना काय झालं? मला एवढा घाम का फुटला आहे?" 

दादा त्या विश्वात एवढा संचारला होता की त्याच्या शरीराने सर्व मानसिक भावनांना प्रतिसाद दिला होता. दादाचा Heart Rate वाढला होता. रक्त गरम झालं होतं. खूप घाम फुटला होता त्याला. 

मी : "दादा काही लक्षात आलं का?  प्रश्न काय होता?  प्रश्नांची उत्तरे मिळाली?"

दादा : "तू अगोदर मला पाणी दे."

दादाने पाण्याचा घोट घेतला. डोकं हलवत 'हुश्श' सोडत दादा भानावर आला. 

दादा बोलायला लागला, "चुकलो मी, जे गडकिल्ले संवर्धनाची आज काय गरज?  हा प्रश्न उभा केला. सर्व लक्षात आलं. ते जंगल म्हणजे 'आजची अक्षम्य व्यवस्था' ज्यापुढे आपण सर्व हतबल आहोत. जंगलात अडकलेला 'मी' म्हणजे आपण सर्व जे यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत. व्यवस्थेविरुद्ध लढणारे सामाजिक कार्यकर्ते. मला झालेल्या जख्मा म्हणजे आपले स्थानिक प्रश्न. ते वर्षानुवर्षे सावरण्याचा प्रयत्न आपण करतोय. पण शेवटी प्रयत्न सोडून मरणाच्या दारात उभे असताना एक चेतना समोर येते. ती मरेपर्यंत प्रयत्न करायला सांगते. ती पाय तुटलेली व्यक्ती म्हणजे 'दुरावस्था झालेले आजचे गडकिल्ले' ज्यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज' या प्रचंड ऊर्जास्रोताला पाहिले आहे. तत्वर ते मरणालाही भ्यायला तयार होत नाही. ती प्रेरणा उठते.. आक्रोश करते.. समोर ठाकलेल्या सर्व प्रश्नांना आव्हान करते. याचा अर्थ हा की सामाजिक प्रश्न सोडवायचे असतील तर महाराष्ट्रातील प्रत्येक मावळ्याने गडकिल्ले संवर्धन जगणे महत्वाचे आहे. इथे येणारी व्यक्ती त्या इतिहासातून प्रेरणा घेते ज्यांनी जिवंत सळसळणारा मावळा पाहिला आहे, ज्यांनी मोघलांपुढे अग्नितांडव करणारे महाराज पाहिले आहेत. मग इथून बाहेर पडणारी व्यक्ती ज्या धगधगत्या प्रेरणेने बाहेर पडते, ती एक चिंगारी पुरेशी आहे महाराष्ट्रातीलच नव्हे तर एव्हाना देशातील तरुणांना सर्व सामाजिक प्रश्नांसमोर उभं करण्यासाठी. 'लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे' हे का बोललं जातं ते आज कळलं भावा."

बंधूंनो, 
जरा अजून ठळक बोलूया. गडकिल्ले संवर्धनाबद्दल बोलायचं तर गडकिल्ले म्हणजे काय हे जाणून घेऊ. हे ते गडकिल्ले आहेत ज्यांनी गेली 2 हजार वर्षानंतरही गुलामगिरी भोगणाऱ्या भारतीय मानसिकतेत  ज्यांनी परिवर्तन आणले त्यांचे साक्षीदार. आता प्रश्न उठतो की महाराजांनी तत्कालीन प्रश्नांना हात घालत स्वराज्य उभे केले पण आज दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नैसर्गिक हानी, अमुक अमुक भीषण समस्या असताना मावळ्यांनी गडकिल्ले संवर्धनात रस घेणे किती पटले असते? तर याचं उत्तर येतं.. हो ! त्यांनी सुद्धा गडकिल्ले संवर्धनावरच भर दिला असता. आज ज्यांचं संवर्धन करायचं आपण म्हणतोय तेच गडकिल्ले महाराजांनी त्यावेळच्या स्थानिक प्रश्नांना फोडून काढण्यासाठी वापरले होते एवढं साधंसरळ गणित आपल्याला कळत नाही हे नवलच.

दुष्काळ तेव्हाही होता तो आजही आहे. गावं आज आहेत तशी तेव्हाही होती मग महाराजांनी किल्लेच का निवडले कारभार पाहायला?  यामागे लागू पडतं त्यांचं भूगोल ज्ञान. महाराज किती मोठे भूगोलतज्ज्ञ होते हे तत्कालीन पुराव्यांनी दाखवून दिले आहे. 

आता बोलूया वारसा जपण्यावर. वारसा आदर म्हणून जपावा का?  तर गडकिल्ले संवर्धन निव्वळ आदर म्हणून वारसा जपण्याची भावना ठेवणं चुकीचं तर नाही पण पुन्हा तुम्हाला प्रतिप्रश्न येऊ नये की 'इतर महत्वाचे प्रश्न असताना हे पटण्याजोगं नाही म्हणून पर्यायी उत्तर. 

आज ज्यांना आपण आद्य दैवत मानतो ते ब्रम्ह-विष्णू-महेश किंवा इतर देवांच्या बाबतीत काय घडतं हो? त्यांचे पुरावे मागितले जातात. दृश्य स्वरूपातील.! शक्यता नाकारता येत नाही की हे सर्व देव कधी ना कधी मनुष्यरूपात होते पण तत्कालीन प्रश्नांना वाचा फोडल्यामुळे इतरांसाठी ते देव झाले. आता मुद्दा येतो पुरावे काय? तर लिखित शास्त्र आणि त्यात त्यांचा उल्लेख.. तोही असमंजस तर्कांना धरून. 

थोर तो आपला हिंदू धर्म जो व्यक्तीकेंद्रित नसून वेद आणि उपनिषदांवर आधारलेला आहे. ते कुणी लिहिलं कसं आलं याबद्दल पुरावे नाहीत हे नशीब. पुढच्या ऋषीमुनींनी त्यावर भाष्य केलं एवढंच. तर इथं गडकिल्ल्यांच्या बाबतीत यांचा संदर्भ देण्याचा उद्देश हा की हजार-दोन हजार वर्षानंतर जर गडकिल्ले राहिलेच नाहीत तर हे महाराजांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं करायला मागेपुढे पाहणार नाहीत. म्हणे असं कुठे असतं का.. की एका सरदारांचा मुलगा काही मोजक्या मावळ्यांना घेऊन बलाढ्य मोघलशाहीविरुद्ध स्वराज्य उभं करतो. काय पण ! ही त्यांच्या प्रिय लोकांची दंतकथा असेल एवढं म्हणायला धजणार नाहीत जसं आज देव-देवतांच्या कहाण्यांना दंतकथा म्हटलं जातं. म्हणून वारसा जपावा. गडकिल्ले जपावे.

आता इतर काही प्रश्नांबद्दल बोलू. बोललं जातं की "गडकिल्ल्यांची जागा मालकीसारखी वापरायची यासाठी हा सर्व खटाटोप." तर सर्वात पहिले हे समजून घेणं महत्वाचे की गडावर फिरायला जाणे वेगळे आणि संवर्धनाला जाणे हे खूप वेगळे. कोणत्याही ठराविक जागेवर काम करायचे म्हटलं की पुरातत्व खात्याची परवानगी आवश्यक असते. प्रत्येक मोहिमे अगोदर किती मेल करावे लागतात याची आपण कल्पनाही करू शकत नाही. यासाठीच केलेल्या कामाचे फोटोही काढावे लागतात. प्रत्येक लेखाजोखा, कामांची इत्थंभूत माहिती पुरातत्व खात्याला द्यावी लागते. चला 'फोटो काढायची काय गरज?' हा प्रश्नही इथे सामायिक झाला. 

तार्किकपणे बोलायचं झालं तर एक सांगा की इतर सामाजिक प्रश्नांमध्ये कार्यरत असलेले लोक ते ठराविक क्षेत्र सोडून इतर किती विषयांमध्ये हात घालतात? हेच गडकिल्ले संवर्धन करणाऱ्यांबद्दल बोलायचं झालं तर गडकिल्ले सोडून निघणारी प्रत्येक व्यक्ती घरी गेल्यावर त्याच्या आसपास घडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला जाणून घेण्याचा प्रयत्न करते. महत्वाचे म्हणजे त्यांच्या डोक्यात काम करणारी जी कार्यप्रणाली असते ती राजा छत्रपतींची असते. म्हणून त्यात शंकाच नाही. ही कार्यप्रणाली त्या व्यक्तीच्या आसपास घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला धगधगत्या निखाऱ्यासारखं पेटवत जाते. प्रसंगाने संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती आपसूकच एका चिंगारीचं रूप धारण करते. आणि अशी इथून पेटते क्रांती !

मी खात्रीशीर सांगू शकतो की पूर्णच्या पूर्ण समाजप्रवाह जरी स्थानिक प्रश्न सोडून निव्वळ गडकिल्ल्यांच्या संवर्धनामागे लागला तर तिथून सर्वच्या सर्व समाजप्रश्नांना फाटा फुटणार आहे. प्रश्न कायम येत राहतील, महत्वाचं आहे त्या प्रश्नांना भिडण्याचं बळ मिळणं आणि तेच काम हे गडकिल्ले करतात. म्हणून सर्व सामाजिक प्रश्नांना सामावून घेणाऱ्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करणं महत्वाचं !

असो वाचकांनो ! निपटते घेतो. एका चर्चेतून ते कळलं जे एव्हाना शांत असताना कधीच नसतं कळलं. गडकिल्ले जपा. मी नाही म्हणणार की त्यांना आपली गरज आहे. हे समजून घ्या की आपल्याला आजही त्यांची गरज आहे. बाकी आपण सुज्ञ ! जय शिवराय.... 


गडकिल्ले संवर्धन ही आपली गरज आहे नाहीतर अन्यायाचा, पारतंत्र्याचा अंधकार पसरायला वेळ नाही लागणार

शिवाजी जन्माला येण्यासाठी दुर्गसंवर्धनाच्या बाळंतपणातून जावेच लागणार आहे...

Whatsapp+
Facebook
Instagram
Youtube
Twitter