भटकंती



तैलबैला आरोहण मोहिम

तैलबैला आरोहण मोहिम

ज्यांचे गडकोट त्यांचा सह्याद्री
या उक्तीप्रमाणेच स्वराज्य रक्षणासाठी  आवश्यक असलेले उंच सुळके,
घाटवाटा , सह्याद्रीच्या कडेकपारीतून उतरणार्या नाळा यांच्यावर घारीप्रमाणे नजर ठेवण्यासाठी तितकेच महत्त्वाचेच .

असाच एक आकाशाला गवसणी घालणारा सुळका म्हणजे तैलबैला

ज्वालामीखीच्या उद्रेकातुन तयार झालेली अभेद्य भिंत म्हणजे तैलबैला....
निसर्ग निर्मितीचा एक अद्भूत नमुना....
राज्यकर्त्यांनी या निसर्गाच्या लेण्याचा केलेला कलात्मक वापर यामुळे तैलबैला वेगळेपण सिद्ध करतोय..

जणू काय घाटवाटा ,नाळांमार्गे  सह्याद्रीत शिरकाव करायचा तर माझी तुमच्यावर नजर आहेच असे रोखून सांगणारा तैलबैला.....

मागील काही वर्षांत याच कातळभिंतींना बा रायगड परिवार दोर लावत आहेत. शेकडो सह्याभटक्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. 
पूर्णपणे सुरक्षित अन आरोहण साहित्याच्या साथीने यशस्वीपणे आरोहण-अवरोहण मोहिमा पार पाडल्यात. 

या मोहिमांमधून मिळणारा सर्व नफा हा गडसंवर्धन अन समाजकार्यासाठी वापरला जातो. त्याचसोबत या मोहिमांमधून परिवारास निष्ठावंत हात मिळतात.

आपणासही कातळकड्याना भिडायचं असेल नक्कीच सहाभागी व्हा.

Whatsapp+
Facebook
Instagram
Youtube
Twitter