A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::open($save_path, $name) should either be compatible with SessionHandlerInterface::open(string $path, string $name): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 132

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::close() should either be compatible with SessionHandlerInterface::close(): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 292

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::read($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::read(string $id): string|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 166

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::write($session_id, $session_data) should either be compatible with SessionHandlerInterface::write(string $id, string $data): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 235

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::destroy($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::destroy(string $id): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 315

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::gc($maxlifetime) should either be compatible with SessionHandlerInterface::gc(int $max_lifetime): int|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 356

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

बा रायगड परिवार,महाराष्ट्र

किल्ले आसावा तोफगाडा



३५० पेक्षा जास्त वर्ष झालीत शिवकाळाला काही किल्ले तर त्याहीपेक्षा आधीचे... अन पडझड झाली पण ती आपण संवर्धन का करतो कारण आपल्या पुढच्या पिढीकडे ते हस्तांतरित व्हावे. या एवढ्या वर्षाच्या पडझडीने, अनास्थेने त्यांच्या भूगोलाप्रमाणे इतिहाससुध्दा झाकोळला गेला आहे. संवर्धन फक्त भौगोलिक अस्तित्व टिकवण्याची धडपड नसून खऱ्या अर्थाने दैदिप्यमान इतिहास जोपासण्याचा उन्नत मार्ग आहे. काही गड एवढे दुर्लक्षित असतात का जनसामान्यांना अगदी हाकेच्या अंतरावर असून सुद्धा माहीत नसतात. पण दुर्गसंवर्धनामधून त्यास नवीन नवसंजीवनी मिळते. 
असाच एक दुर्लक्षित किल्ला म्हणजे बोईसर जवळचा आसावा..
औद्योगिक क्रांतीच्या प्रभावाने झाकोळून गेलेला एक दुर्लक्षित गड. मुंबईपासून मोजून दोन-अडीच तासांवर पण म्हणावी तशी पाऊले तिकडं वळत नाही. संवर्धनाच्या प्रतीक्षेत जणू.  परिवाराने गड संवर्धनाला घ्यायचं ठरवलं अन २९ डिसेंबर २०१७ रोजी पहिली मोहीम ठरली. 
उदक पाहून गड बांधावा या महाराजांच्या उक्तीप्रमाणे गड बांधले गेले. पण आता पाणी पाहून संवर्धनासी घ्यावे असे म्हणायला हरकत नाही. गड माथ्यावर बरीच पाण्याची खोदीव व एक बांधीव टाके आहे. पण एकही मोकळे नाही म्हणून गडावर पाण्याचे दुर्भिक्ष. सगळी टाकी गाळाने काठोकाठ भरलेली.  पाणी आहे पण त्यासाठी अर्धा डोंगर उतरून खाली जावे लागते. पाणी नसल्याने गडमाथ्यावर काम करणे म्हणजे काम जिकरीचे. ठरलं तर मग गडावरील पूर्ण क्षमतेने गाळाने भरलेलं टाकं सर्वप्रथम मोकळे करायचा विडा उचलला.
टाके गाळमुक्त केल्याने  पाण्याचा अन गडावर झाडे लावण्याचा मार्ग मोकळा होणार होता. पहिल्याच मोहिमेपासून टाके साफ करायच्या उद्देशाने लगबग चालू झाली. उन्हाचा तडाखा, दमट वातावरण , धो धो पाऊस या सर्वांवर मात करत कार्य चालू होते. 
निस्वार्थी सेवेला फळ हे मिळतेच... 
जवळपास वर्ष उलटून गेले पण टाकं काय गाळमुक्त होईना. होतेच म्हणा तेवढं मोठे अन शिबंदी तुटपुंजी..
अशाच एके दिवशी संख्येअभावी अगदी रद्द होणाऱ्या मोहिमेने मूर्त जिद्दीने मूर्त स्वरूप घेतले. अगदी १० जणांच्या चमूने १३ जानेवारी २०१९ रोजी गाळ काढण्याच्या उद्देशाने पाय गडावर ठेवले. इमाने इतबारे कार्य करीत असताना चुन्याचा दगड सावकाश काढण्याच्या प्रयत्नांत असलेले परिवाराचे धूलिकण श्री. नितीन भोसले यांच्या पहारीने एक नेहमीपेक्षा वेगळा आवाज केला. सर्वांचे कान टवकारले अन एकत्र आले अन पाहतो तर काय या दुर्लक्षित गडाचा अपरिचित वारसा मुक्तीच्या दिशेने वर पाहतोय.  निःस्वार्थ सेवेचा गडदेवतेने दिलेला प्रसाद जणू. सापडली एक मुलुखमैदान तोफ...
हि असावा वरील १० वी संवर्धन मोहिम होती..
या मोहिमेत गडलक्ष्मीने पोरांच्या पाठीवर कौतुकाचे छत्र धरले.उमेद निर्माण करणारी गोष्ट घडली...
इंग्रजी बनावटीची ओतीव तोफ.
तोंडचा व्यास 8:5cm
पुढचा परीघ 54cm
मागचा परीघ 74cm
लांबी-140cm

तोफ सापडल्याने सर्वाना एक नवी उमेद मिळाली अन पुन्हा लगेचच पुढच्या रविवारी म्हणजे २० जानेवारी ला पुढची मोहीम आखली. याहिमोहिमेत गडलक्ष्मी अजून एक यश पदरात टाकले. अजून एक लहान तोफ अर्धवर तुटलेली तोफ सापडली, ही आकाराने आधीच्या तोफेपेक्षा  लहान होती. ३१ इंच लांबीची (तुटलेल्या टोकापर्यंत) एक जण हाताळू शकतो अशी तोफ सापडली. आनंद द्विगुणीत झाला.

गड म्हटलं की तो लढता ठेवणे अपरिहार्यच या अनुषंगाने गडावर शस्त्रसाठा हा हवाच,नव्हे असायचाच..
पण,गडा गडांवरील तोफा कुठे गेल्यात हे कळायला काही मार्ग नाही.
काही तोफा लोकांनी गडांच्या खाली अक्षरशा ढकलून दिल्या.ज्या अकाराने लहान होत्या त्या घरात ठेवण्यासाठी नेल्या.

पण,हि भरभक्कम बांधणीची तोफ मिळणे म्हणजे काही साधी सुधी बाब नव्हे.गड चढून घाम गाळणाऱ्या आम्हा पोरांस त्याच कीती कौतुक म्हणून सांगू...!
जणू शिवरायांनी पाठीवर मारलेली ही कौतुकाची थापच.!!

आसावाचा इतिहास उलगडण्यासाठी एक महत्वाचा दुआ सापडला होता. या  तोफेस तिचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तीस भक्कम सागवानी तोफगाड्यावर विराजमान करण्याचे ठरले. परिवाराच्या चैत्राली अन राहुलने हे तोफगाडा निर्मितीचे कार्य तडीस नेले. लोकसहभागातून या मुलूखमैदान तोफेस रविवार १६ जून २०१९ रोजी विराजमान केले अन तिचे स्वराज्य अर्पण मोठ्या दिमाखात अन भांडऱ्याच्या उधळणीत पार पडले. 

या तोफेने काय दिले ? गडाच्या इतिहासातील पाने उलगडण्यास मदत झाली, गडावर येणाऱ्या लोकांची संख्या वाढली, स्थानिकांचा सहभाग वाढला अन महत्वाचे म्हणजे एक नवी उमेद मिळाली संवर्धन मोहिमेतील सदस्य संख्या वाढू लागली अन कार्य जोमाने होऊ लागले. 

या पूर्ण प्रवासात आसावा संवर्धन मोहिमेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सुशांत कुरणे यांच्यासह असंख्य हातांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. असेच भरभक्कम कार्य प्रत्येक गडावर होवो अन गड पुन्हा पहिल्यासारखे राबते व्हावेत...स्वराज्य पुन्हा प्रस्थापित व्हावे...



Whatsapp+
Facebook
Instagram
Youtube
Twitter