A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::open($save_path, $name) should either be compatible with SessionHandlerInterface::open(string $path, string $name): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 132

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::close() should either be compatible with SessionHandlerInterface::close(): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 292

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::read($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::read(string $id): string|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 166

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::write($session_id, $session_data) should either be compatible with SessionHandlerInterface::write(string $id, string $data): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 235

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::destroy($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::destroy(string $id): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 315

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::gc($maxlifetime) should either be compatible with SessionHandlerInterface::gc(int $max_lifetime): int|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 356

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

बा रायगड परिवार,महाराष्ट्र

सुधागड महादरवाजा



सुधागड महादरवाजा -

एकेकाळी महाराजांनी राजधानीसाठी पर्याय म्हणून निवडलेला किल्ला म्हणजे सुधागड. राजधानीचा पर्याय असल्या कारणाने सुधागडवरील बांधकामेसुद्धा तशीच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यापैकीच एक म्हणजे सुधागडाचा महादरवाजा. 

हा महादरवाजा म्हणजे रायगडावरच्या महादरवाजाची हुबेहूब प्रतिकृती. मोजमापाने जवळपास रायगड महादरवाजाइतकाच असलेला हा महादरवाजा बांधणीच्या बाबतीतही रायगडाच्या महादरवाजाशी साधर्म्य दाखवतो. साडे आठ फूट रुंद व 15 फूट उंच हा दरवाजा रायगडाप्रमाणेच गोमुखी बांधणीचा आहे. दरवाजाच्या दर्शनी भागावर हिंदू धर्मात अतिशय पूजनीय स्थान असलेली कमलपुष्प कोरलेली आहेत. त्याचप्रमाणे दोन शरमशिल्पे देखील आहेत. महादरवाजाच्या वरच्या बाजूस सुबक कमान तसेच महिरप आहे. रात्रीच्या पहारीसाठी मशाली व पलुते अडकवण्याची सोय देखील केलेली आहे. दरवाजाच्या उंबऱ्यातून पाणी जाण्याची सोय आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. बऱ्याच अंतरापर्यंत पायऱ्यांचे अवशेष देखील दिसतात. सर्वभक्षी काळाच्या ओघात व वरील पाणलोट क्षेत्रामुळे हा दरवाजा पूर्णपणे मातीत गाडला गेला होता. 1987 च्या आसपास निसर्गमित्र संस्थेने 3 वर्षे काम करून येथील बहुतांश माती काढली परंतु ती पुन्हा साचल्याने पुन्हा एकदा पूर्णमित्र पालीवाला कॉलेज, निसर्गमित्र व गिरिमित्र प्रतिष्ठान या संस्थांनी मिळून 2003 ते 2008 या काळात ही माती पुन्हा साफ केली.

महादरवाजा लाकडी प्रवेशद्वार -

2017 साली बा रायगड परिवाराने सुधागड किल्ला संवर्धनासाठी हातात घेत काही महत्वाची कामे गडावर राबविण्यास सुरुवात केली. यात महादरवाजा परिसर संवर्धन व लाकडी प्रवेशद्वार अर्पण हे एक महत्वाचे काम होते. 

या महादरवाजास लाकडी द्वार बसवणे सोपे काम खचितच नव्हते. सुधागड हा चढाईसाठी अवघड समजला जाणारा किल्ला. अश्या किल्ल्यावर द्वार बसवण्याचे हे काम बा रायगड परिवाराच्या धूलिकणांनी स्वीकारले. महादरवाजाचे पूर्ण बारकाव्यासकट मोजमाप घेण्यात आले. सदर मोजमापावरून दरवाजा बनविण्याचे काम वखारीत पार पडणार होते. दरवाजा तसा प्रचंड. या मापाचे लाकूड मिळणे तसे सोपे काम नव्हते. हवे तसे, हव्या त्या मापाचे सागवानी लाकूड मिळवण्यासाठी बराच खटाटोप करावा लागला. घेतलेल्या मोजमापावरून दरवाजाचा लाकडी साचा बनला. दुसरीकडे यावर लागणाऱ्या बिजागरी व इतर शोभेच्या लोखंडी वस्तूंचे काम चालू होते. दरवाजाचा प्रत्येक भाग पुरातन पद्धतीचा असावा. पूर्वीच्या तंत्रज्ञानानेच दरवाजा लागावा हे लक्षात घेऊनच दरवाजाचे काम केले गेले. 5 लाकडी भाग, दरवाजावरील लाकडी नक्षीकामाचे तुकडे, लोखंडी बिजागऱ्या, तसेच अणकुचीदार खिळे, लोखंडी शोभेची फुले अश्या वेगवेगळ्या भागांमध्ये दरवाजा तयार झाला.

आव्हान वाट पाहत होते. जिथे तिथे मोकळ्या हाताने चढ़तानाही दमछाक घेते अश्या  सुधागडावर हा दिड टन वजनाचा ऐवज चढ़वायचा होता. बा रायगड परिवारा तर्फे २३ नोव्हेंबर  ची तारिख नक्की करण्यात आली आणि तमाम शिवप्रेमी व दुर्गप्रेमिंना सोशल मिडीयाच्या माध्यमातून श्रमदानाचे आवाहन करण्यात आले. बा रायगड परिवाराच्या ह्या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत जवळपास २५० दुर्गप्रेमी   या मोहिमेत सहभागी झाले. गडाची वाट तशी बिकटच. काही ठिकाणी एकावेळी एकच माणुस जाण्याइतकी अरुंद वाट, काही ठिकाणी मोठे दगड, तर दोन लोखंडी शिड्या, चिलखती बुरुजाची खडी चढाई अशी कित्येक आव्हाने झेलत मावळ्यांनी सलग १८ तासात दरवाजाचे सामान गडावर नेऊन पोहचवण्याचे अशक्यप्राय काम शक्य केले. 

या पुढचा प्रवासही सोपा नव्हता. गडावर विजेची सोय नाही. मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असतानाही सलग काही शनिवार-रविवार व वेळप्रसंगी सलग 5 दिवस गडावर राहून दरवाजा उभारणीचे काम बा रायगड परिवाराच्या धूलिकणांनी पूर्णत्वास नेले. या कामात काही अनुभवी सुतारांनी परिवाराच्या धूलिकणांना मार्गदर्शन मदत करत विषम परिस्तिथीतही दरवाजा उभारणीच्या कामात महत्वपूर्ण योगदान दिले. 

महादरवाजा लोकार्पण -

दि. 19 फेब्रुवारी 2020 रोजी शिवजयंतीचे औचित्य साधत या लाकडी प्रवेशद्वार लोकार्पणचा सोहळा सुमारे 1500 दुर्गप्रेमींच्या उपस्थितीत पार पडला. महादरवाजाच्या लाकडी प्रवेशद्वाराचे लोकार्पण हुतात्मा दीपक घाडगे यांच्या कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आले.



Whatsapp+
Facebook
Instagram
Youtube
Twitter