A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::open($save_path, $name) should either be compatible with SessionHandlerInterface::open(string $path, string $name): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 132

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::close() should either be compatible with SessionHandlerInterface::close(): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 292

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::read($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::read(string $id): string|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 166

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::write($session_id, $session_data) should either be compatible with SessionHandlerInterface::write(string $id, string $data): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 235

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::destroy($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::destroy(string $id): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 315

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::gc($maxlifetime) should either be compatible with SessionHandlerInterface::gc(int $max_lifetime): int|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 356

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

बा रायगड परिवार,महाराष्ट्र

रायगड राजगृह तर लिंगाणा कारागृह



रायरीचा उपदुर्ग म्हणून महाराजांनी लिंगाणा उभारला. लिंगाण्याचे अस्तित्व शिवपूर्वकाळापासून आहे. महाराजांनी त्याची डागडुजी करून त्यास गड बनवला अन त्याचे कारागृह म्हणून वापर केला.

लिंगाणा म्हणजे एक अभेद्य सुळका एवढीच ओळख असलेला अन अनास्थेने किल्ला म्हणून विस्मरणात गेलेला एक दुर्ग. आरोहनाच्या सुळक्यासोबतच लिंगाण्याच्या पोटात एक किल्ला आहे. त्याचा महाराजांनी कारागृह म्हणून वापर केला. घाटावरून उतरणाऱ्या बऱ्याच नाळवाटांवर, त्यामार्गे होणाऱ्या व्यापारावर, रायगडाकडे येणाऱ्या शत्रूवर लिंगाणा नजर रोखून आहे. 
लिंगाण्याचा मुख्य मार्ग हा कोकणातून पाने गावातून आहे. आधी लिंगाणा माची मग किल्ला असा मार्ग आहे. पण  प्रस्तरारोहणाच्या वाढत्या व्यावसायिकतेमुळे मोहरी,पुणे गावातून बोराट्याची नाळ उतरून आरोहण केले जाते.  जुना आरोहणाचा मार्ग हा सुद्धा पाने गावातूनच होता.
लिंगाणा किल्ल्यावर चहूबाजूला पाण्याची टाकं अन किल्ल्यात बरेच दुर्गवैभव आहे. गडावर जाण्यासाठी पूर्वी लिंगाणा माचीहून वर पायवाटेने अन काही ठिकाणी पायऱ्या होत्या. मार्ग आताही दिसतो. गतकाळात झालेलं भुसख्खलन अन नंतर इंग्रजांनी उद्ध्वस्त केलेले किल्ल्यांचे मार्ग यामुळे वाट आता नाहीशी झाली आहे. माचीवर मधल्या टप्यात आल्यावर तिथे पाण्याचे टाके, गुहा, शिवपिंड आदि अवशेष आहेत. येथूनच वर गडावर जाण्यासाठी असलेला बांधीव पायरीमार्ग आहे. पण उध्वस्त केला आहे त्याच्या काही पायऱ्या आजही मार्गाचे अस्तित्व दाखवतात. पण त्यामुळे आता गडावर सहज पोचता येत नाही कारण मार्ग उरला नाही. त्यामुळे आता गडावर जायचं असल्यास प्रस्तरारोहणाचे साहित्य अन तंत्र अवगत असले पाहिजे. लिंगाणा किल्ल्यावर जाणे तेव्हाही अवघडच होते. शिड्या अन दोर कापले तर किल्ल्यावर पळून जाणे अशक्य त्यामुळे कैदी पळून जाण्यासही धजावत नव्हते.

परिवारातर्फे लिंगाण्यावर बऱ्याच आरोहण मोहिमा झाल्या अन याच लिंगाण्याने परिवाराला भरपूर निष्ठावंत हात सुद्धा दिले. त्याच लिंगाण्याची उतराई म्हणून  गडावर जाण्याचा मार्ग सुकर करायचा परिवाराने ठरवलं. 

गडावर जाण्यासाठी कायमस्वरूपी लोखंडी रोप लावण्याचे नियोजन ठरले. ६ व ७ एप्रिल २०१९ रोजी दोन दिवसीय मोहिम आखली गेली. किल्ल्यावर असेच जाणे अवघड आहे अन त्यात लोखंडी रोप व इतर साहित्य चढवणे म्हणजे दिव्यच. पण परिवाराच्या धुलिकानांनी हे धनुष्य लिलया पेलेलं.  एक टीम साहित्य लोखंडी रोप व इतर साहित्य घेऊन पाने लिंगाणा माची करत व दुसरी टीम जेवण साहित्य घेऊन मोहरीतून लिंगाण्याच्या पायथ्याला आली. 
सध्याच्या प्रचलित आरोहण मार्गावरून दोन वर्षांपूर्वी दिवंगत अरुण सावंत सरांच्या टीम ने ट्रॅव्हर्स मोकळा करून किल्ल्याकडे जाणारी वाट तयार केली होती. ही वाट अत्यंत धोकादायक आहे. थोडीशी चूक जिवावर बेतू शकते. या धोकादायक वळणावर लोखंडी रोप लावून मार्ग सुरक्षित केला गेला. गडावर जाण्यासाठीचा पायरीमार्ग उध्वस्त झाला आहे त्या ठिकाणी लोखंडी रोप लावून मार्ग चढाई करण्यासाठी सुकर केला आहे. 
अरुण सरांनी किल्ल्यातून सुळक्यावर चढाई केलेली त्यामुळे बोलटिंग साठी अँकर मारून ठेवलेले आहेत. याचा अँकर फासनर, हँगर प्लेट अन डी क्लॅम्प च्या साहाय्याने रोप फिक्सिंग केले गेले. या लोखंडी रोपवर स्वतः आम्ही लटकून चाचणी केली आहे. ते सुरक्षित आहेत याची खात्री केली आहे. 
आता गडावर जाण्यासाठी अडचण नसली तरी मार्ग  धोकादायकच आहे. त्यामुळे गडावर जाताना माहितगार घेऊनच जावे. आरोहण साहित्य असल्यास उत्तमच. पण वाटाड्या पाहिजेच.

या मोहिमेत सहभागी सदस्यांनी केलेली बेजोड मेहनत अन प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर हे कार्य तडीस गेले आहे. मोहिमेतील सर्व सहभागी सदस्यांचे विशेष कौतुक अन अभिमान आहे.

ऊन, वारा, पाऊस यामुळे लोखंडी रोपची झीज ही होणारच त्यामुळे जाताना व्यवस्थित जावे. सहज जाता येतंय म्हणून बेफिकीर राहू नये. आम्ही रोप लावला असला तरी लिंगाण्याची दुर्गमता अन अभेद्यता राखली आहे. त्यामुळे पूर्ण काळजी घेऊनच किल्ल्यास भेट द्यावी ही नम्र विनंती.



Whatsapp+
Facebook
Instagram
Youtube
Twitter