A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::open($save_path, $name) should either be compatible with SessionHandlerInterface::open(string $path, string $name): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 132

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::close() should either be compatible with SessionHandlerInterface::close(): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 292

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::read($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::read(string $id): string|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 166

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::write($session_id, $session_data) should either be compatible with SessionHandlerInterface::write(string $id, string $data): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 235

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::destroy($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::destroy(string $id): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 315

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::gc($maxlifetime) should either be compatible with SessionHandlerInterface::gc(int $max_lifetime): int|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 356

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

बा रायगड परिवार,महाराष्ट्र

ब्लॉग



कृष्णाजी भास्कर कुलकर्णी

कृष्णाजी भास्कर कुलकर्णी…

स्वराज्यावर चालून आलेले सर्वात मोठे संकट म्हणजे विजापुरी सरदार अफजलखान याची स्वराज्यावरील स्वारी होय.

शिवरायांचा वाढता प्रभाव तसेच स्वराज्याची होणारी भरभराट पाहून अलि अदिलशहाने आपला मात्तब्बर सरदार अफजल खान यास शिवरायांना संपविण्याकरीता पाठविले. याच वेळी अली अदिलशहाने स्वराज्यातील सरदारांना आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न चालविले. अलि अदिलशहाने अशा अशयाचे एक फर्मान सरदार कान्होजी जेधे यांस पाठविले.(मुळ फर्मान फारसी मद्ये आहे.) त्यात अलि अदिलशहा म्हणतो, “शिवाजीमुळे कोकणातील मुसलमानी धर्माची वाढ खुंटली आहे. म्हणूनच मी अफजलखान नावाच्या माझ्या सरदाराला त्याच्यावर पाठविले आहे.” (अलि अदिलशहा शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतो). या फर्मानातील उल्लेख लक्षात घेता समजते की, अफजलखान कोणत्याही प्रकारे आपल्या राज्याच्या सिमा वाढविण्यासाठी आला नसून मुसलमान धर्म रक्षण करण्यासाठी व हिंदु धर्म बुडविण्यासाठी आला होता.

दोन्हीही पक्षातील वकिलांची भेट झाली. महाराजांच्या वतिने निष्ठावान वकील गोपीनाथ पंत बोकील तर खानातर्फे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांची चर्चा झाली. कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने शिवाजी महाराजांची भेट घेतली. शके १५८१,विकारी संवत्सरे कार्तिक मासी कृष्णाजी हजीब राजश्री स्वामीकडे पाठविला. त्यास वस्रे देऊन प्रतापगडाचे पायथ्याशी भेट व्हावी हा निश्चय केला. कान्होजी जेधे , सरकारकून बैसोन राजश्री स्वामींनी विचार केला की, मुसलमान बेईमान आहे. (जेधे शकावली) जावळी च्या गर्द झाडीत लपलेल्या प्रतापगडावर भेट घेण्याचा बेत ठरला. कलम ठारले, दोघांच्याही रक्षणासाठी सज्ज, शुर व निष्ठावान अशा दहा दहा सैनिकांनी बाणाच्या टप्प्यावर येऊन उभे रहावे. (शिवभारत)

शके १५८१ , मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी गुरुवारी (१० नोव्हेंबर १६५९) अफजलखान प्रतापगडचे माचीवर भेटीस आला. राजश्री स्वामी किलीयावरुन उतरुन भेटीस आले. भेटी समयीं येकांगी करुन अफजलखान जिवे मारिला. शीर कापले.(जेधे शकावली)

छत्रपती शिवाजी नामक वाघाने अफजलखान नामक बोकड फाडला. मात्र याच वेळी अफजलखानाचा वकिल कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने अफजलखानाची तलवार उगारुन शिवरायांवर शस्त्र प्रहार करण्याचा प्रयत्न केला. शिवकालीन कवी शिवभारतात लिहीतात,

“ब्राम्हणाला शिवाजी ठार मारणार नाही” असे जाणून अफजलखानाने त्या ब्राम्हण योद्ध्यास युद्धात सहभागी करुन घेतले होते. (शिवभारत -२१, ४७)

तो ब्राम्हण आहे असे ऐकून जाणत्या व नितीने वागणाऱ्या शिवाजी राजाने त्यास ठार मारण्याची इच्छा केली नाही.(शिवभारत -२१, ४८)

अफजलखानाचे सैनिक तेथे पोचले नाहीत तोच त्याने (कृष्णाजी) ती तलवार शिवाजी वर हाणली.(शिवभारत -२१, ४९)

त्याने केलेला प्रहार शिवाजीने आपल्या तलवारीने अडविला. आणि पट्ट्याने खानाच्या डोक्यचे दोन तुकडे केले. (शिवभारत -२१, ५०)

वरील चारही श्लोक हे शिवभारतातील असून हे काव्य लिहीणारा कवी अफजल वधाच्या वेळी अस्तित्वात होता. शिवरायांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याला मारल्याचा कोणताही उल्लेख कवी ह्या काव्यात करत नाही.

इतर उपलब्ध कागदपत्रांचा विचार करता,

ते समयी गोपीनाथ वकील सांपडले. लोकांनी वलखिले नाही. सिवाजी राजे त्यांनी पंताजीपंतास रक्षिले. व कृष्णाजी भास्कर त्यासही मारु दिधले नाही. त्यास मार्ग दिधला. लस्करांत सांगावयास माघारी जीव घेऊन गेला. (९१ कलमी बखर, कलम ३४)

शिवरायांनी अफजलखानाचा खेळ संपविल्या नंतर प्रतापगडाच्या युद्धाचे वर्णन शाहिर आज्ञानदासांनी आपल्या पोवाड्यात करताना, कृष्णाजी भास्कर यांचे कृत्य वर्णन करताना कथीत केले,

अबदुलखान झाला पुरा । कृष्णाजी ब्राह्मण उठावला ॥

शिवाजी राजा बोलला । “ब्राह्मणा मारुं नये तुला ।

तुजशीं मारतां शंकर हांसेल आम्हांला” ॥ नाइकतां ब्राह्मणें ।

हात दुसरा मारिला । “ब्राह्मणा मारुं नये तुला ।

क्रिया शहाजीची आम्हांला” ॥ कृष्णाजी ब्राह्मण(णें) ।

हात तिसरा टाकिला ॥ (तरी) होईल ब्रह्महत्या भोंसल्यासी ।

( म्हणून ) शिवांजीनें राखिला ॥ कृष्णाजी ब्राह्मण मागें सरला ।

सैद बंडु मोहरे आला ॥ जवळ होता जिउ म्हाल्या ।

त्यानें सैद पुरा केला ॥

आज्ञानदासाने केलेल्या पोवाड्यात कृष्णाजी भास्कर यांनी राज्यांवर वार केला मात्र राज्यांनी त्याला मारले नाही.

प्रतापगड युद्धाविषयी इतर उल्लेख पहाता, जेधे शकावली, कृष्णाजी अनंत सभासदकृत श्री शिवाजी महाराजांची बखर, ग्राण्ड डफ लिखीत A History of Marathas, शेडगावकर भोसले बखर या सर्व ग्रंथांतील अफजलखान प्रकरणात, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांस जीवे मारल्याचा उल्लेख कोठेही सापडत नाही. या उलट अफजलखानाच्या वधा नंतर कृष्णाजी भस्कर कुलकर्णी हे स्वराज्य सेवेत दाखल झाल्याचे उल्लेख इतिहासात पहायला मिळतात.

५ एप्रिल १६६८ रोजी कृष्णाजी भास्कर सुभेदार यांचे हैबतराव नाईक सिलीबकर यांस लिहीलेले पत्र उपस्थित आहे. (शि.प.सा.सं. १२०७)

१० अॉक्टोबर १६६८ रोजी कृष्णाजी भास्कर सुभेदार व छत्रपती शिवराय यांच्यातील पत्रव्यवहार शि. प. सा.सं 1222 मद्ये पहायला मिळतो.

शके १५९५ , प्रमादी संवछरे

सरसेनापती प्रतापराव गुजर व आनंदराव यांची बेलोलखान या विजापुरी सरदार यांच्याशी झालेल्या उमराणीच्या लढ्यामद्धे कृष्णाजी भास्कर हे नाव प्रतापरावांच्या फौजेत आसल्याचे प्रकर्षाने अढळुन येते. (पर्णालपर्वतग्रहणाख्यान)

वरील सर्व घडून गेलेला शिवकाळातील घडामोडींचा कार्यकाळ पहाता.. लक्षात येते की शिवरायांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांस मारले नसून त्यांना स्वराज्य कार्यात सहभागी करुन घेतले होते.

धन्यवाद…

आपलाच…

Whatsapp+
Facebook
Instagram
Youtube
Twitter