A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::open($save_path, $name) should either be compatible with SessionHandlerInterface::open(string $path, string $name): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 132

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::close() should either be compatible with SessionHandlerInterface::close(): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 292

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::read($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::read(string $id): string|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 166

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::write($session_id, $session_data) should either be compatible with SessionHandlerInterface::write(string $id, string $data): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 235

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::destroy($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::destroy(string $id): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 315

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::gc($maxlifetime) should either be compatible with SessionHandlerInterface::gc(int $max_lifetime): int|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 356

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

बा रायगड परिवार,महाराष्ट्र

भटकंती



बा रायगडी जाणारी मुख्य मोहीम

बा रायगडी जाणारी मुख्य मोहीम

" बहुत उंच चखोट हिमालय जरी,
सहयाद्री शोभितो अजिंक्य रणांगणापरी,
स्वराज्याचा मांडला डाव या भूवरी,
या सह्य मंडळी ठाई शिवबा छत्रचामर धरी."

हा सहयाद्री म्हणजे राकट, चिवट, कधीही न झुकणारा आहे.

स्वातंत्र्याचे मुळ इथल्या मातीत आहे, रक्तात आहे.

 या सहयाद्री च्या जीवावरच एका जहागिरदाराच्या पोराने  स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले अन 
पाच - पाच  पातशाहांच्या उरावर थयथयाट करत हिंदवी स्वराज्य स्थापन केले.  दरी , खोरे , अवघड नाळवाटा - घाटवाटा , राखणकर्ते गडकोट, घनदाट जंगल, समृद्ध करणाऱ्या नद्या यामुळे हा सह्याद्री अजिंक्य राहिला आहे अन राहणार..
शिवरायांचे शक्तीस्थळ म्हणजे हा सहयाद्री. हिवाळ्यात मन मोहून टाकणारा, हिरवाकंच शालू परीधान केलेला सहयाद्री।

उन्हाळ्यात आकाशीच्या सुर्य भास्कराला जणु स्वतःहा मध्ये विलीन करू पाहत आहे, 
राकट रौद्र रूप दाखवायला मात्र पावसाळ्यात सुरवात करतो..
शुभ्र धवल जलधारा अभिषिक्त सहयाद्रीच्या राजस्वाच प्रेमळ तथा रौद्र रूप दर्शवित असतात..
     
उत्तरेतील यवनीराज्य या सहयाद्रीच्या धाकानेच नर्मदा ओलांडायलाच धजावत असेल.
लोप पावत असलेले हिंदवी साम्राज्य क्षात्रकुलोत्पन्न मराठयांनी पुनश्च निर्माण केले. 
शिवचरित्राचा खरा तथा मुळ, स्वराज्याचे सार म्हणजे हे गडकोट अन हे गडकोट ज्या दुर्गम सहयाद्रीच्या घाटवाटा , नाळवाटांवर उभारले तेच खरे या गडकोटांचे शिल्पकार. 
या सहयाद्रीमध्ये  भटकताना जर तुम्ही त्याचा आदर केलात तर तो तुमच्यावर बापासारखी छाया अन  आईसारखी माया करेल, पण माजून अपमान केलात तर जन्माची अद्दल घडविल्याशिवाय राहणार नाही,
हौशे - नौशे - गौशे - लहान - थोर, जातिवंत भटके यांच्या स्वच्छंद विराहाचे ठिकाण म्हणजे सहयाद्री , गडकोट अन ह्या घाटवाटा - नाळवाटा..

सहयाद्रीने या महाराष्ट्रभूचे कोकण व घाट माथा असे विभाजन केले आहे. 
महाराजांच्या स्वराज्याची सुरवात हा घाटमाथ्या वरील मावळातून झाली.
अगदी स्वराज्याची स्थापना या मावळातून होऊन रयतेच्या राजाच सिंहासन सजल ते  घाटावरून खाली उतरून कोकणातील रायरीच्या डोंगरावर

बा रायगड परिवाराची संपूर्ण वाटचाल या भटकंती मोहिमेतून होत आलेली आहे. भटकंती मोहिमेतूनच परिवाराला खूप सारे निष्ठावंत हात मिळाले आहेत.  अन त्याच अनुषंगाने दरवर्षी पावसाळ्यात परिवाराची एक तीन दिवसीय मुख्य पदभ्रमंती मोहीम होत असते. विविध किल्ल्यांवरून किल्ले रायगडी ही मोहीम जात असते. सुरवातीला राजगड ते रायगड अशी झालेली सुरवात अन त्यास विस्तारलेला परिवाराचा वटवृक्ष.   या पदभ्रमण मोहिमेतून परिवारास अनेक रत्न मिळालेले आहेत जे आज परिवाराची धुरा समर्थपणे सांभाळत आहे.

परिवाराची प्रत्येक मोहीम काही उन्नत उद्देशाने आखलेली असते. या मोहिमेचा मार्ग हा ऐतिहासिक असतो. घाटावरून कोकणात बऱ्याच घाटवाटा-नाळवाटा उतरतात. शिवकाळात याच मार्गावरून व्यापार अन संदेशवहनाचे काम कमी वेळात केले जायचे. 
घाटावरून रायगडाकडे कमी वेळात पोचण्यासाठी अवघड नाळवाटांनी मावळे रायगडाकडे कूच करत असत. काही मार्ग हे प्रचलित तर काही छुपे आहेत.

घाटावरील एका गडावर सुरू केलेली ही यात्रा रायरीचा जहागिरदारासमोर नतमस्तक होऊन संपन्न होते. एका गडावरील पावन मृदा तसेच या मार्गातील महाराजांच्या मावळ्यांच्या गावातील मृदा , घाटवाटांमधील मृदा कृतज्ञ भावनेने रायगडच्या राजसदरेत पसरणे हा भटकंतीमगिल मुख्य उद्देश असतो.
या मार्गावरील ग्रामीण जीवनशैली, राहणीमान , इथल्या स्थानिक लोकांची आपुलकी , निष्ठा या सर्वांचा धांडोळा या मोहिमेत केला जातो. ऊन, वारा, पाऊस रायगडच्या सेवेत मावळे कसे इमानेइतबारे सेवा देत असतील, त्यांची शारीरिक-मानसिक क्षमता काय असेल हे जोखण्यासाठी या मोहिमेचे आयोजन केले जाते. 

या मार्गावरील परिवाराच्या काही मोहिमा ( याचे सविस्तर प्रवासवर्णन परिवाराच्या 'फिरस्ते सह्याद्रीचे' या अंकात उपलब्ध आहेत):

राजगड ते रायगड  (आग्याच्या नाळेतून) - जगायला शिकवणारी मोहीम म्हणजे आग्याच्या राजगड ते रायगड ही पदभ्रमंती मोहीम. याच मोहिमेत परिवाराच्या बिजाला अंकुर फुटला. संघभावनेचा कस पाहणारी ही मोहीम एकमेकांच्या साथीशिवाय पावसाळ्यात पूर्ण करणे केवळ अशक्य.  राजगड - शेणवड - पासळी - कुसुरपेठ - एकलगाव - दापोली - रायगड  असा या मोहिमेचा बहुतांशी पाण्यातून जाणारा मार्ग.

रायगड ते राजगड ( बोरट्याच्या नाळेतून ) -  रणरणत्या उन्हात रायगडावरून सुरू झालेली ही मोहीम राजगडाकडे संपली होती. उन्हात बोराट्याची नाळ चढून रायगड जवळ करणे म्हणजे शारीरिक क्षमतेची कस पाहणारा प्रवास. 
रायगड - पाने - लिंगाणा माची - बोराट्याची नाळ - मोहरी - हारपूड - भट्टी - तोरणा - राजगड असा या मोहिमेचा मार्ग..

सिंहगड ते राजगड (सिंगापूर नाळेतुन) -  नरवीर तानाजी मालुसरेंच्या समाधीस्थळाची मृदा रायगडावर पसरवणे हेतून सिंहगडावरून सुरू झालेली यात्रा ऐतिहासिक सिंगापूर नाळेतून रायगडाकडे संपन्न झाली.
सिंहगड - विंझर - साखर - गुंजवणी - राजगड - शेणवड - पासळी - कुसुरपेठ - सिंगापूर - सिंगापूर नाळ - वारंगी - रायगड असा या मोहिमेचा मार्ग होता. 

रायरेश्वर ते रायगड (परमाची नाळमार्गे) - स्वराज्याची शपथ ते तख्त अशी ही मोहीम रायरेश्वरावरून हिरडस मावळातून दोन किल्ल्यांच्या साक्षीने ऐतिहासिक मार्गावरून अविस्मरणीय रित्या रायगडावर संपन्न झाली. रायरेश्वर - निवंगुन - शिरवली - नीरा देवघर जलाशय - दुर्गाडी - मोहनगड - शिरगाव - वरंधा घाट - कावळ्यागड - परमाची नाळ - वरंध - सेंदूरमलाई - वाघोली - रायगड  असा ऐतिहासिक मार्ग होता या मोहिमेचा. 

रोहिडेश्वर ते रायगड (मढेघाट मार्गे) - हिरडस मावळातील सरदारांच्या गावातून जाणाऱ्या ऐतिहासिक मार्गावर ही मोहीम आखली गेली होती. सरदारांच्या गावातील पावन मृदा तसेच नरवीर तानाजी मालूसरेंचे पार्थिव ज्या घाटातून उमराठ्याला नेले त्या मढेघाटातून रायगड जवळ करणे म्हणजे परमभाग्य. 
रोहिडेश्वर - चिखलावडे - पिसावरे (कृष्णाजी बांदल) - महूडे (रायाजी बांदल) - घेवडेश्वर - पांगारी - भुतोंडे (येसाजी कंक) - खुलशी - केळद - मढेघाट - सेंदूरमलाई - वाघोली - रायगड असा या मोहिमेचा मार्ग होता.

यापुढे अजून नवनवीन ऐतिहासिक मार्गावरून परिवाराच्या मोहिमा आखल्या जातील अन त्या मार्गावरील लोकांच्या जीवनशैलीचा धांडोळा घेतला जाईल.  
आपण सर्वांनी या मोहिमांमध्ये सहभागी होऊन अविस्मरणीय भटकंतीचा अनुभव घ्यावा..

Whatsapp+
Facebook
Instagram
Youtube
Twitter