A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::open($save_path, $name) should either be compatible with SessionHandlerInterface::open(string $path, string $name): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 132

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::close() should either be compatible with SessionHandlerInterface::close(): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 292

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::read($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::read(string $id): string|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 166

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::write($session_id, $session_data) should either be compatible with SessionHandlerInterface::write(string $id, string $data): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 235

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::destroy($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::destroy(string $id): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 315

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::gc($maxlifetime) should either be compatible with SessionHandlerInterface::gc(int $max_lifetime): int|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 356

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

बा रायगड परिवार,महाराष्ट्र

भटकंती



दुर्गराज राजगड प्रदक्षिणा तळवटितुन व अभ्यास मोहीम

"दुर्गराज राजगड प्रदक्षिणा तळवटितुन व अभ्यास मोहीम"

कोणत्याही गडाची अभेद्यता, भव्यता , विस्तार, व्याप्ती अन जडणघडण जाणून घ्यायची असेल तर फक्त गडावर जाऊन भटकंती करण्यात अर्थ नाहीये. गड राहळतील गावे , तेथील लोक, आडमार्गावरील अवशेष यासर्वानी मिळून एक परिपूर्ण अभ्यास होतो. त्यात राजगड सारखा किल्ला ज्यावर महाराजांनी सर्वाधिक काळ वास्तव्य केले याचा इतिहास , भव्यता समजून घेण्यासाठी तळवटीतून प्रदक्षिणा करणे गरजेचे होते.

#सरसेनापतीयेसाजीकंक यांच्या भुतोंडे येथील वाड्यापासुन दुर्गराज राजगडाची तळवटितून प्रदक्षिणा पुन्हा वाड्यापर्यंत.. प्रदक्षिणा मार्गावर असणा-या ऐतिहासिक वास्तु ठिकाणे याचें स्थलदर्शन, रखरखत्या ऊन्हात हि दोन दिवसाची तागंडतोड प्रदक्षिणा फक्त एका दिवसात करायची होती..

 मोहिमेची रूपरेषा ठरली. तारीख निश्चित झाली ३० एप्रिल ते १ मे.

२९ एप्रिल २०१७ रोजी रात्री सर्वजण भुतोंडे गावात पोहोचले. सर्वप्रथम येसाजीराव कंक यांचा वाडा आणि त्यांनी युद्धात वापरलेल्या शस्त्रांचे दर्शन सर्वानी घेऊन जेवणाचा कार्यक्रम उरकून लवकर सर्व झोपी गेले. सकाळी  ३ वाजताच मोहिमेचा एल्गार झाला. प्रातःविधी उरकून चहा पाणी घेऊन शिववंदनेनी प्रदक्षिणेला सुरवात झाली. भल्या पहाटेची निरव शांतता आणि चंद्राच्या शीतल प्रकाशात पायवाटा तुडवत राजगड जवळ करायला सुरवात झाली.

सूर्यदेव दर्शन देण्या अगोदर जास्तीत जास्त अंतर कापायचे होते..तंगडतोडीला सुरुवात झाली होती..जाताना मात्र सर्वांनी रानमेवा करवंदांच्या मनसोक्त आस्वाद घेतला. काळ्या टिपूर गोड गोड करवंदांनी मन तृप्त करून टाकले. समोर राजगड बलदंड रामोश्यासारखा दिसतो! अभेद्य्य, बळकट... #सुवेळा_माचीचा काळाकभिन्न पाषाण नजरेने जवळ करत  मळे गावातून उजव्या बाजूने वळसा मारून राजगड जवळ केला.  पद्मावती माची आणि पद्मावती मंदिरात दर्शन घेऊन सर्वांनी अल्पोहर घेतला. पुढच्या प्रवासाला सुरवात करताना मात्र बेलाग,बळकट आणि कराल असा बालेकिल्ला आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर घारीप्रमाणे दोन्ही पंख पसरून मायेची पखरण करणारा राजगड नजरेत साठवून घेण्यासारखा आहे.

आता वेळ होती राजगड उतरून गुंजवणी मार्गे परत  प्रदिक्षणामार्गावर परतण्याची. सर्वजण गुंजवणी येथे उतरून थोडा आराम करून पाली गावातून पुनः प्रदिक्षणा मार्गावर आले.
मजल दरमजल करत  सर्वजण सायंकाळी सात वाजेपर्यंत पुन्हा भुतोंडे गावात पोचले. 

जवळपास ३५ किलोमीटरची ही प्रदिक्षणा एका दिवसात अन तेही रणरणत्या उन्हात करने म्हणजे दिव्यच होते. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे राजगडावर भरपूर अभ्यास असलेले गुरुवर्य श्री. आप्पासाहेब परब मार्गदर्शनासाठी दाखल झाले होते. 

राजगडाला प्रदिक्षणा घातल्यावर आप्पांचे मार्गदर्शन म्हणजे दुग्धशर्करा योग. सगळे दमून भागून आले असेल तरी जेवण झाल्यावर सगळे आप्पांचा अमृयकुंभातील ज्ञानबिंदू वेचण्यासाठी सगळे सज्ज झाले. 
आप्पानी सविस्तर मार्गदर्शन केल्यावर पुन्हा मोहिमेतील थकवा दूर करण्याच्या कार्यक्रमाला सुरवात झाली. सगरसंगीत भजनाने दिवसभराचा थकवा दूर झाला. 

कालची दिवसभराची भटकंती, मार्गदर्शन, भजन या सगळ्यांच्या आठवणीत रात्र सरून समारोपाचा दिवस उजाडला.

चहा नाश्ता झाल्यावर पुन्हा एकदा आप्पानी त्यांच्या अभ्यासातील राजगड आम्हा समोर खुला केला. सविस्तर मार्गदर्शनपर व्याख्यान त्यावरील प्रश्न अन त्यावर चर्चेने वातावरणात इतिहासमय होऊन गेले.

येसाजी कंक यांचे वंशज शशिकांत काका कंक अन त्यांचे चिरंजीव सिध्दार्थदादा कंक म्हणजे खरी काळजी वाहणारे सरदार. कंकांचा वाडा, देव्हारा, शस्त्र त्यांनी आम्हांसमोर मोकळेपणाने ठेवला. साधी आपुलकीने जपणारी ही माणसे. 
कंकाच्या इतिहासाचा उहापोह केल्यानंतर जेवणाच्या पंगती बसल्या. 

अन पुन्हा एकदा भजनाच्या कार्यक्रमाने सोहळ्याची सांगता झाली.

ही मोहीम भटकंती, इतिहास मार्गदर्शन, येसाजी कंक यांच्या वंशजांची भेट ,सांस्कृतिक कार्यक्रम अशी एक परिपूर्ण मोहीम झाली.

Whatsapp+
Facebook
Instagram
Youtube
Twitter